November 15, 2024 2:24 PM

views 51

जनजाती गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जमुई इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जनजाती गौरव दिवसाच्या निमित्ताने ६ हजार ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. पीएम-जनमन योजनेअंतर्गत बांधलेल्या ११ हजार घरांचा गृहप्रवेशही त्यांनी यावेळी केला. तसंच, त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाचा प्रारंभ करताना बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आणि समृद्ध आदिवासी वारसा तसंच संस्कृतीवर आधारित प्रदर्शनाचं उद्घाटनही केलं. यासोबत त्यांनी दोन आदिवासी स्वातंत्...

November 15, 2024 10:27 AM

views 23

सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणीपेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल राज्यात तीन ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल, असा आरोप मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांची एकजूट तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. हे लोक आपापसात लढले तर काँग्रेस मजबूत होईल, असा दावा त्यांनी या सभेत केला. सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणी पेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. या विधानसभा निवडणुकीतील पंतप्रधाना...

November 14, 2024 8:24 PM

views 26

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. या महोत्सवाची संकल्पना प्रगतीशील भारतासाठी शांतता आणि सौहार्द अशी आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्दिष्ट बोडोलँडसह आसाम, पश्चिम बंगाल, नेपाळ आणि ईशान्येकडील इतर आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणाऱ्या स्थानिकानं एकत्रित करणं आणि त्यांचा सांस्कृतिक वारसा, पर्यावरणीय जैवविविधता आणि पर्यटन क्षमता समृद्ध करणं हा आहे.

November 14, 2024 7:34 PM

views 81

महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

महाराष्ट्राचा विकास हीच महायुतीची प्राथमिकता असून महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज खारघर इथं प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेल्या कामाचा आढावा घेतला. केंद्र सरकारन दहा वर्षांत २५ कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर काढलं, चार कोटी बेघर लोकांना घर दिलं, जलजीवन मिशनद्वारे बारा कोटी घरांना पाणी दिलं, बारा कोटी गरीबांच्या घरी शौचालय बनवलं असं मोदी यांनी सांगितलं.     महायुती सरका...

November 14, 2024 5:02 PM

views 25

राज्यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिली जात आहे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्राला विकसित भारताचं नेतृत्व करायचं असून त्यादृष्टीनं राज्यात अनेक अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रचारसभेत केलं. समृद्धी महामार्ग, रेल्वेचं आधुनिकीकरण, औद्योगिक पार्क, टेक्सटाइल पार्क इत्यादींचा उल्लेख करून यामुळे या भागातल्या तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   विकासासोबतच परंपरेकडेही आपल्या सरकारचं लक्ष असल्याचं सांगून पालखी महामार्ग,...

November 14, 2024 1:38 PM

views 33

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना डॉमिनिका देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना डॉमिनिका देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. कोविड महामारीच्या काळातल्या कामगिरीच्या गौरवार्थ, आणि दोन्ही देशांतली भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. गयाना इथं होणाऱ्या इंडिया CARICOM या परिषदेत हा सन्मान प्रदान करण्यात येईल.   

November 14, 2024 1:32 PM

views 32

प्रधानमंत्री येत्या शनिवारपासून नायजेरिया, ब्राझील आणि गयानाच्या ६ दिवसांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शनिवारपासून नायजेरिया, ब्राझील आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना दिली. १९व्या जी वीस शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी १८ आणि १९ नोव्हेंबरला ब्राझीलला भेट देणार असून त्यांचा हा तिसरा अधिकृत ब्राझील दौरा आहे.

November 13, 2024 8:40 PM

views 38

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राज्यात ३ प्रचार सभा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राज्यात ३ प्रचार सभा घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारी, नवीमुंबई आणि मुंबईत शिवाजीपार्कवर संध्याकाळी ते सभा घेणार आहेत.  विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या दुपारी नंदूरबारमध्ये आणि त्यानंतर नांदेडमध्ये प्रचारसभेला संबोधित करतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे दुपारी नाशिक जिल्ह्यात इगतपुरीत आणि संध्याकाळी पुण्यात प्रचार सभा घेणार आहेत. 

November 12, 2024 8:07 PM

views 40

राज्यात परकीय गुंतवणुकीचा पुण्याला फायदा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

गेल्या काही वर्षात राज्यात परकीय गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून याचा फायदा पुण्याला झाल्याचं प्रधानमंत्री पुण्यात झालेल्या प्रचारसभेत म्हणाले. परकीय कंपन्यांची पसंती महाराष्ट्राला सर्वाधिक आहे, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुंतवणूक वाढल्यावर पुण्यात कंपन्यांची संख्या वाढली. त्यामुळे तरुणांना रोजगाराची संधी निर्माण झाली असं मोदी यांनी सांगितलं. 

November 12, 2024 7:54 PM

views 40

महायुती सत्तेत आल्यावर विकासाचा वेग दुप्पट होणार, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी आता एक आठवडाच शिल्लक असल्यानं सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते झंझावाती दौरे करुन आपापल्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेत आहेत.    महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक झाली असून विमानतळ, महामार्ग, डिजिटल कनेक्टिव्हीटी, सिंचन, लोहमार्ग, वंदे भारत ट्रेन असा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे...