November 19, 2024 9:11 AM

views 37

‘एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य’ संकल्पना अद्यापही समर्पक – प्रधानमंत्री

नवी दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या जी-20 शिखर परिषदेची एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य ही संकल्पना अद्यापही समर्पक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ब्राझिलच्या रीओ दी जेनेरो शहरांत सुरु असलेल्या जी-20 देशांच्या शिखरपरिषदेत ते काल बोलत होते. सामाजिक समरसता तसंच भूक आणि गरिबी निर्मुलन याविषयावर आयोजित चर्चासत्रांत ते बोलत होते. भारताच्या अधयक्षपदाच्या कार्यकाळांत सुरु झालेली मानवकेंद्रित निर्णयांची परंपरा ब्राझिलच्या अध्यक्षतेखालील कार्यप्रणालीतही सुरु असल्याचं ते म्हणाले. ...

November 18, 2024 1:29 PM

views 45

विकसित भारताचं उद्दिष्ट ठेवून भारताची प्रगतीच्या मार्गावर वाटचाल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नायजेरियामधून रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायाशी अबुजा इथं संवाद साधला. विकसित भारताचं उद्दिष्ट समोर ठेवून भारतानं प्रगतीच्या मार्गावर वाटचाल सुरु केली आहे असं  ते म्हणाले. आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात भारताने केलेल्या कामगिरीचा उल्लेख करुन ते म्हणाले की जगाच्या दृष्टीने ही भारत आशेचा नवा किरण बनला आहे.

November 18, 2024 1:30 PM

views 47

आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेत लाभार्थींची संख्या १० लाखापेक्षा जास्त

ज्येष्ठ नागरिकांसाठी अलिकडेच सुरु केलेल्या आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेत ७० वर्षापेक्षा जास्त वयाच्या लाभार्थींची संख्या १० लाखापेक्षा जास्त झाली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सांगितलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या २९ ऑक्टोबरला योजनेचं उद्घाटन केल्यानंतर अवघ्या ३ आठवड्यात हा पल्ला योजनेनं पार केला. लाभार्थ्यांमधे सुमारे ४ लाख महिला आहेत.

November 18, 2024 1:01 PM

views 40

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये जी-२० शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर असून आज सकाळी या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते ब्राझिलला पोहोचले आहेत. तिथं मोदी यांचं भारतीय जनसमुदायानं उत्साहाने जोरदार स्वागत केलं. ब्राझिलमधल्या  रिओ डी जानिरो शहरात आयोजित जी-२० शिखर परिषदेला आज उपस्थित राहणार आहेत. शिखर परिषदेच्या निमित्ताने तिथे आलेल्या  जागतिक नेत्यांबरोबर ते द्विपक्षीय चर्चा करतील. शिखर परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये  अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा समावेश आहे. गेल्य...

November 17, 2024 8:02 PM

views 23

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी आज द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा त्यांनी घेतला. संरक्षण, उर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात नायजेरियाबरोबरच्या भागीदारीला भारताच्या दृष्टीने महत्त्व असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. या चर्चेनंतर सांस्कृतिक देवाणघेवाण, सीमाशुल्क सहकार्य आणि सर्वेक्षण सहकार्य संबंधातल्या ३ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.  नायजेरियातला सर्वोच्च सन्मान ग...

November 16, 2024 5:38 PM

views 34

चुकीची माहिती देऊन ती पसरवणाऱ्या समाज माध्यमांच्या आजच्या युगात सरकार खंबीर आणि दृढनिश्चयी -प्रधानमंत्री

चुकीची माहिती देऊन ती पसरवणाऱ्या समाज माध्यमांच्या आजच्या युगात सरकार खंबीर आणि दृढनिश्चयी आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खाजगी माध्यम संस्थेनं आयोजित केलेल्या लीडरशिप समिटमधे व्यक्त केलं. सरकार मतपेढीच्या राजकारणापासून दूर असून लोकांच्या प्रगतीचा मंत्र घेऊन काम करत आहे, देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले. भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवणं हे आपलं लक्ष्य असल्याचं ते म...

November 16, 2024 5:20 PM

views 54

प्रधानमंत्र्यांचा नमो ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्र भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नमो ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ ही या संवादामागची संकल्पना होती. मतदारांना भाजपाच्या संकल्पांची माहिती समजावून सांगून भाजपाला मतदान करण्याचं आवाहन प्रेमानं करावं, असं मोदी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं. महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम आपण अनुभवलं असून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे भाजपासाठी अनुकूल वातावरण अस...

November 15, 2024 8:07 PM

views 18

प्रधानमंत्री उद्या राज्यातल्या १ लाख बूथ प्रमुखांशी नमोऍपच्या माध्यमातून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या भारतीय जनता पक्षाच्या माझा बूथ सर्वात मजबूत या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातल्या १ लाख बूथ प्रमुखांशी नमो ऍपच्या माध्यमातून, तसंच दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधतील. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

November 15, 2024 3:48 PM

views 30

आदिवासी समाजाचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

आपलं सरकार आदिवासी समाजाचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. जमुई इथल्या जाहीरसभेला ते संबोधित करत होते. धरती आबा जनजाती ग्रामउत्कर्ष अभियानांतर्गत आदिवासी गावांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ८० हजार कोटी रुपये खर्च केले जातील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदिवासी समाजासाठी असा उपक्रम राबविल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.   आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये बिरसा मुंडा गौरव उपवन...

November 15, 2024 7:35 PM

views 41

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आरक्षण हटवेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप

काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल, असा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांची एकजूट तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. हे लोक आपापसात लढले तर काँग्रेस मजबूत होईल, असा दावा त्यांनी या सभेत केला. सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणी पेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. या विधानसभा निवडणुकीतील प्रधानमंत्र्याची ही राज्यातील शेवटची प्रचारसभा होती. यावेळी त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्या...