August 7, 2026 8:19 PM

views 55

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिरला यांनी येत्या ९ तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.   त्यानंतर बिरला यांन...

July 31, 2026 8:43 PM

views 44

संसदेच्या दोन्ही सभागृहांंचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

 विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांंचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं.  त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्म - मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या एक वर्षानंतर आणि २ वर्ष कालावधी पूर्वी नोंदणी करायची असेल तर याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्म-मृत्यू नंतर २ वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकार...