August 23, 2025 9:59 AM
57
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 29 तारखेपासून चार दिवस जपान आणि चीन दौऱ्यावर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 29 तारखेपासून चार दिवस जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. प्रधानमंत्री मोदी 15 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 29 आणि 30 ऑगस्ट हे दोन दिवस जपानला भेट देणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हा आठवा जपान दौरा असेल. तर जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्या समवेत ते पहिल्यांदाच या शिखर परिषदेत सहभागी होतील. या दौऱ्यात ते त्यांच्या समपदस्थांसमवेत संरक्षण, सुरक्षा, व्यापार आणि अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान अशी क्षेत्रांमधल्या भारत आणि जपान यांच्यातील वि...