June 16, 2024 2:35 PM

views 81

‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १११व्या भागात ३० जूनला प्रधानमंत्री साधणार श्रोत्यांशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १११व्या भागात येत्या ३० तारखेला देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांचा ‘मन की बात’चा हा पहिलाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपले विचार आणि सूचना १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकावर तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा मायगव्ह खुल्या मंचावर येत्या २८ जूनपर्यंत कळवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे. ‘मन की बात’ कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून आकाशव...

June 15, 2024 1:09 PM

views 68

इटलीचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज नवी दिल्लीत आगमन

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी इटलीचा दौरा आटोपून आज नवी दिल्लीला परतले. हा दौरा अतिशय फलदायी झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमवरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. या दौऱ्यात जागतिक नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं. जागतिक समुदायाला लाभदायक ठरतील अशा प्रभावी उपाययोजना आखण्यासह भावी पिढीसाठी एका उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी वचनबद्धता दर्शवली, असंही ते म्हणाले.   विकसनशील देशांबाबतच्या, विशेषतः आफ्रिकेच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी काल ज...

June 15, 2024 11:24 AM

views 73

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विविध राष्ट्रप्रमुखांबरोबर चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी-सात शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. प्रधानमंत्र्यांनी काल दुपारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. संरक्षण, आण्विक, अवकाश, शिक्षण, हवामानविषयक तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, संस्कृती या क्षेत्रांमध्ये भागिदारी वाढवण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी चर्चा केली. मेक इन इंडिया मोहिमेला बळ देण्यासाठी धोरणात्मक संरक्षण भागिदारी वाढवण्यावर त्यांचं एकमत झालं. फ्रान्समध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या कृत्रिम ...

June 13, 2024 9:14 PM

views 71

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल, तर प्रधानमंंत्र्याच्या प्रधान सचिवपदी पी. के. मिश्रा यांची फेरनियुक्ती

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल, तर प्रधानमंंत्र्याचे प्रधान सचिव म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी डॉक्टर पी. के. मिश्रा यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं आज या नियुक्त्यांना मंजुरी दिली. डोवाल आणि मिश्रा यांच्या नियुक्तीचा कालावधी पुढच्या आदेशापर्यंत किंवा प्रधानमंत्र्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत राहील, असं केंद्रीय आस्थापना मंत्रालयानं कळवलं आहे.

June 13, 2024 9:16 PM

views 36

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी-शिखर परिषदेसाठी ईटलीला रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज ईटलीला रवाना झाले. भारत-इटली धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी तसंच भारत-प्रशांत आणि भूमध्यसागरीय प्रदेशांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीला जाण्यापूर्वी दिलं.   इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून ते G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जात आहेत. यानिमित्तानं इटलीला भेट होत असल्याचा मला आनंद आहे, असंही मोदी म्हणाले. या परिषदेत, कृत्रिम बुद्धि...