November 1, 2024 10:03 AM

views 73

भारत – न्यूझीलंड यांच्यातला तिसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून मुंबईत

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडीयमवर खेळला जाणार आहे. न्यूझीलंडने या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.

October 27, 2024 8:40 PM

views 58

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघ पराभवाच्या छायेत

न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघ पराभवाच्या छायेत आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित ५० षटकात नऊ बाद २५९ धावा केल्या. भारताकडून राधा यादवनं चार, दीप्ती शर्मानं दोन, तर सायमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा यांनी प्रत्येकी एक खेळाडू बाद केला. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी ढेपाळली. सामना वाचवण्यासाठी राधा यादव आणि सायमा ठाकूर चिवट झुंज देत आहेत. 

October 26, 2024 8:44 PM

views 51

न्यूझीलंडविरुद्ध तीन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव

न्यूझीलंडविरुद्ध तीन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या सलग दुसऱ्या सामन्यात आज भारताचा पराभव झाला. पहिल्या डावातल्या १०३ धावांच्या महत्वपूर्ण आघाडीसह न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या एकूण ३५९ धावांच्या आव्हानाचा सामना करताना भारतीय संघाचा दुसरा डाव २४५ धावांत आटोपला. आजच्या पराभवासह  भारताने ही मालिकाही गमावली आहे. मालिकेतला शेवटचा सामना १ नोव्हेंबर रोजी होणार आहे.  भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने केलेल्या ७७ धावा आणि रविंद्र जडेजाच्या ४२ धावांचा अपवाद वगळता इतर फलं...

October 25, 2024 8:09 PM

views 46

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडे ३०१ धावांची आघाडी

कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात न्यूझिलंडने आज दिवसअखेर ५ गड्यांच्या मोबदल्यात १९८ धावा केल्या. यासह न्यूझिलंडने सामन्यात ३०१ धावांची आघाडी घेतली आहे. वॉशिंग्टन सुंदरने चार तर आर. अश्विन याने एक गडी बाद केला.    त्याआधी भारताचा पहिला डाव १५६ धावांवर आटोपला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजी ढेपाळली. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत हे खेळाडू फारशी चमक न दाखवताच तंबूत परतले. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी प्रत्येकी ३० धावा केल्या. तर रवींद्र जडेजा य...

October 23, 2024 2:23 PM

views 43

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या पुण्यात होणार

  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार आहे.   रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला बंगळुरू इथं पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागला असल्यानं हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ निकराचे प्रयत्न करेल. यजमान संघ सध्या तीन सामन्यांच्या मालिकेत १- ० अशा पिछाडीवर आहे. भारतीय संघात अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचा उर्वरित मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.  

October 21, 2024 8:50 AM

views 62

बंगळुरू क्रिकेट कसोटीमध्ये न्यूझीलंडचा भारतावर ८ गडी राखून विजय

बंगळुरू क्रिकेट कसोटीमध्ये न्यूझीलंडनं काल भारताचा आठ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतानं विजयासाठी दिलेलं १०७ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडनं दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. उभय संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना 24 तारखेपासून पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे. तर तिसरा सामना एक नोव्हेंबरपासून मुंबईतल्या वानखेडे मैदानावर खेळला जाईल.

October 20, 2024 10:24 AM

views 48

कसोटी क्रिकेट मालिकेत आज न्यूझिलंड आणि भारत यांच्यात दुसऱ्या डावाचा सामना

बंगळुरु इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझिलंड आज दुसऱ्या डावाची सुरुवात करणार आहे. एमए चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझिलंडला जिंकण्यासाठी केवळ 107 धावांची गरज आहे. कसोटीच्या कालच्या चौथ्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात 462 धावा केल्या. सरफराज खानची शतकी खेळी आणि ऋषभ पंतच्या केवळ एका धावेनं हुकलेल्या शतकाच्या जोरावर भारताला ही धावसंख्या उभारता आली. त्याआधी न्यूझीलंडनं 402 धावा केल्या होत्या. भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. जागतिक कसोटी क्र...

October 18, 2024 9:11 AM

views 51

बंगळुरु कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडकडे १३४ धावांची आघाडी

बंगळुरु कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला. भारतीय संघाची ही मायदेशातली सर्वात कमी आणि एकूण तिसऱ्या क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. विराट कोहलीसह भारताचे पाच खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं २० आणि यशस्वी जयस्वालनं १३ धावा केल्या. मॅट हेन्रीनं १५ धावात ५ तर विल्यम ओरूक यानं १२ धावात ४ बळी घेतले. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या ३ बाद १८० धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडकडं आतापर्यंत १३४ धावांची आघाडी आहे.

October 17, 2024 7:44 PM

views 48

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात ४६ धावात गारद

न्यूझीलंड विरुद्ध भारत कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या ३ बाद १८० धावा झाल्या. आता न्यूझीलंडकडे १३४ धावांची आघाडी आहे. भारताच्या कुलदीप यादव, आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी टिपला. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर आज झालेल्या या सामन्यात फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ अवघ्या ४६ धावांमध्ये गारद झाला. कोहलीसह भारताचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. रिषभ पंतनं २० आणि यशस्वी जयस्वालनं १३ धावा केल्या. मॅट हेन्रीनं १५ धावात ५ गड...

October 14, 2024 9:27 AM

views 49

महिला टी -20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाची भारतीय संघावर मात

महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, शारजाह इथं काल रात्री झालेल्या अ गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा नऊ धावांनी पराभव केला. 152 धावांचा पाठलाग करताना भारतानं वीस षटकांत नऊ बाद 142 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद 54 तर दीप्ती शर्मानं 29 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत आठ गडी गमावून 151 धावा केल्या.