December 4, 2024 8:17 PM

views 84

क्रिकेट : १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारताचा विजय

क्रिकेटमध्ये १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारतानं संयुक्त अरब अमिरातीवर दहा गडी राखून विजय मिळवला. यूएईच्या  १३८ धावांचं आव्हान भारतानं सतराव्या षटकातच पूर्ण केलं. आयुष म्हात्रेनं ६७ तर वैभव सूर्यवंशीने ७६ धावा करत भारताच्या  विजयावर शिक्कामोर्तब केलं.  त्याआधी संयुक्त अरब अमिरातीनं  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रायन खानच्या ३५ आणि अशत रायच्या २६ धावा वगळता   यूएईचे अन्य फलंदाज फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाहीत. भारताच्या युद्धाजित गुहा याने तीन तर चेतन शर्मा आणि हार्दिक रा...

December 2, 2024 7:20 PM

views 65

U-19 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अ-गटात भारताचा जपानवर २११ धावांनी विजय

१९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज अ-गटात भारताने जपानचा २११ धावांनी पराभव केला. संयुक्त अरब अमिरातीतल्या शारजाह स्टेडीयमवर झालेल्या या सामन्यात जपानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर भारताने विजयासाठी दिलेलं ३४० धावांचं उद्दिष्ट गाठताना जपानचा डाव १२९ धावांवर आटोपला. अ -गटातल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातींच्या संघाला ६० धावांनी पराभूत केलं. 

November 25, 2024 7:09 PM

views 72

भारताची बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत विजयी सलामी

बॉर्डर- गावस्कर करंडक कसोटी मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट सामन्यात आज भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १- शून्यने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या सामन्यात भारतानं यजमान संघाला २९५ धावांनी धूळ चारली. हा विजय भारताचा सगळ्यात मोठ्या कसोटी विजयांपैकी एक ठरला.   भारताचा कर्णधार जसप्रित बुमरा आणि मोहम्मद सिराज  यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ २३८ धावांमधे गुंडाळला गेला. तत्पूर्वी विराट कोहलीची नाब...

November 19, 2024 3:44 PM

views 51

महिला क्रिकेट एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाबरोबर होणाऱ्या महिला क्रिकेट एकदिवसीय मालिकेतून भारताची आघाडीची फलंदाज शफाली वर्मा हिला वगळलं आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. स्मृती मंधना ही उप कर्णधार आहे. वेगवान गोलंदाज हरलीन देओल दुखापतीतूून सावरली असून संघात परतली आहे, तर यास्तिका भाटिया आणि रिचा घोष या सोळा सदस्यांच्या संघात यष्टीरक्षक असतील.

November 18, 2024 1:36 PM

views 37

क्रिकेट : कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकणार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा येत्या २२ नोव्हेंबरपासून पर्थ इथे सुरू होणाऱ्या बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेचा पहिला सामना खेळू शकणार नाही. ही कसोटी सामन्यांची स्पर्धा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली जाणार आहे. शर्मा याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा कर्णधार असेल. रोहित व्यतिरिक्त शुभमन गिल हा देखील अंगठ्याच्या दुखापतीमुळेही पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. रोहित आणि शुभमन ऐवजी या सामन्यात के एल राहुल आणि अभिमन्यू इश्वरन खेळणार आहेत.

November 10, 2024 8:09 PM

views 73

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना गकेबेरा इथं सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला.  भारताच्या फलंदाजीची सुरुवात मात्र खराब झाली. संघाच्या केवळ ५ धावाच झाल्या असताना भारताचे दोन्ही सलामीवर तंबूत परतले. त्यानंतर कर्णधार सुर्यकुमार यादवही केवळ ४ धावा करून बाद झाला.

November 8, 2024 10:05 AM

views 70

भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानचा पहिला टी 20 क्रिकेट सामना आज डर्बनमध्ये

भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानच्या चार टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज रात्री डर्बनमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेआठ वाजता सामन्याला सुरूवात होईल.   सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला परदेशी भूमीवर उत्तम कामगिरी दाखवण्याची संधी आहे. या संघानं घरच्या मैदनावर बांग्लादेश विरूद्धची टी-20 मालिका 3-0 नं जिंकली होती. सध्या भारतीय संघ टी-20 संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर तर दक्षिण अफ्रिका सहाव्या स्थानावर आहे.

November 4, 2024 3:30 PM

views 66

वृद्धिमान साहाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज वृद्धिमान साहा याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सध्या सुरू असलेला रणजी करंडकाचा हंगाम हा शेवटचा असेल, असं त्याने समाज माध्यमावरच्या संदेशात लिहिलं आहे. साहा याने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत ४० कसोटी आणि ९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. सध्याच्या रणजी हंगामात तो बंगालच्या संघाचा कर्णधार आहे.

November 2, 2024 9:49 AM

views 47

मुंबईत न्यूझीलंडविरूद्ध कसोटी सामन्यात भारत पहिल्या डावात 149 धावांनी पिछाडीवर

मुंबईत सुरू असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात 149 धावांनी पिछाडीवर आहे. काल दिवसअखेर भारताच्या 4 बाद 86 धावा झाल्या होत्या.   शुभमन गिल 31 आणि ऋषभ पंत 1 धावांवर खेळत आहेत. तत्पूर्वी न्यूझीलंडचा डाव 235 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रविंद्र जडेजानं न्यूझीलंडचे 5, तर वॉशिंग्टन सुंदरनं 4 गडी बाद केले.

November 1, 2024 2:05 PM

views 64

आय पी एल साठी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या २०२५ हंगामासाठी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. २०२४ च्या आय पी एल हंगामासाठी रोहित शर्माच्या जागी त्याला कर्णधारपद दिलं होतं.   याआधीही मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलेल्या हार्दिकनं मधल्या काळात गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणूनही प्रभावी कामगिरी केली होती. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आय पी एल चं विजेतेपद पटकावलं आहे.