October 13, 2024 3:02 PM

views 52

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला येत्या १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. या कसोटी सामन्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार तर जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून बंगळुरू इथं होणार आहे. दुसरा सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात तर तिसरा सामना एक नोव्हेंबरपासून मुंबईत होणार आहे.

October 11, 2024 10:55 AM

views 53

महिला क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 8 खेळाडू राखून केला पराभव

महिलांच्या ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री शारजा इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 8 खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने 20 षटकांत 8 खेळाडू बाद 103 धावा केल्या.   बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलतानाने 44 चेंडूत 39 धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या करिश्मा रामहरकने बांगलादेशचे 4 गडी बाद केले. आज अ गटात, गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा सामना पाकिस्तान महिला संघाबरोबर - दुबई मध्ये होईल.

October 9, 2024 3:32 PM

views 65

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य राहणे असेल मुंबई संघाचा कर्णधार

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठीचा मुंबई संघ जाहीर झाला असून, इराणी चषक स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटू तनुष कोटियन याला मुंबई संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. २०२४-२५ च्या या स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्यांसाठी १६ सदस्यीय मुंबई संघातून तनुष आपलं कसब दाखवेल. स्पर्धेच्या ‘एलिट ग्रुप ए’ चा सामना येत्या शुक्रवारी बडोद्यातल्या कोटांबी क्रीडांगणावर होत असून मुंबई संघाची लढत बडोदा संघाशी होईल. मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य राहणे आहे.

October 1, 2024 3:52 PM

views 47

बांगलादेशविरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका भारतानं जिंकली

बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना आज भारतानं जिंकला. बांग्लादेशाकडून मिळालेलं ९५ धावांचं आव्हान भारतानं ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. भारतानं ही मालिका २-० अशी जिंकली. यशस्वी जयस्वाल सामनावीर तर आर. अश्विन मालिकावीर ठरला.    पाचव्या दिवशी बांगलादेशाचा दुसरा डाव १४६ धावांवर आटोपला. जसप्रित बुमराह, आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. यशस्वी जयस्वालच्या ५१ आणि विराट कोहलीच्या नाबाद २९ धावांच्या बळावर भारतानं हा सामना जिंकला.

September 30, 2024 1:55 PM

views 83

भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या आजच्या चौथ्या दिवशी बांगलादेशाचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला. चौथ्या दिवशी बांगलादेशनं पहिल्या डावातल्या १०७ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली होती. तत्पूर्वी, काल तिसऱ्या दिवसाचा खेळ मैदान ओलं असल्यामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करावा लागला, तर दुसरा दिवस मुसळधार पावसामुळे पाण्यात गेला. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या १-० नं आघाडीवर आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या नाबाद २९ धावा झाल्या होत्या. 

September 29, 2024 4:09 PM

views 65

भारत आणि बांग्लादेशात दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द

भारत आणि बांग्लादेशात कानपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं आज तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला गेला. पावसामुळे काल दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नव्हता तर, पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ झाल्यानंतर खेळ थांबवावा लागला होता. त्यावेळी बांग्लादेशानं ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारत पहिला सामना जिंकून १-० नं आघाडीवर आहे.

September 25, 2024 8:05 PM

views 61

क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या दोन खेळाडूंना पहिल्या दहा खेळाडूत स्थान

कसोटी क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत या दोघांनी पहिल्या दहा खेळाडूत स्थान मिळवलं आहे. ७५१ गुणांसह जयस्वालनं पाचवं तर पंतनं ७३१ गुणांसह सहावं स्थान पटकावलं आहे. चेन्नईत बांगलादेशाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयात या दोघांचा सिंहाचा वाटा होता. 

September 20, 2024 7:16 PM

views 74

भारत- बांगलादेशकसोटी सामन्याच्या दिवसअखेर आज भारताची आघाडी

  भारत आणि बांगलादेश या दोन संघांदरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आज दिवसअखेर भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दिवस संपला तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात ३ गडी बाद, ८१ धावा झाल्या होत्या. रिषभ पंत आणि शुभमन गिल आज नाबाद राहिल्यानं उद्या फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.   तत्पूर्वी, भारतानं पहिल्या डावात ३७४ धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशच्या संघाला सर्वबाद, १४९ धावाच करता आल्या. जसप्रीत बुमराहनं चार गड्यांना तं...

September 12, 2024 1:04 PM

views 69

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड कसोटी सामन्याचा सलग चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यानच्या एकमेव क्रिकेट कसोटी सामन्याचा आजचा सलग चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द करावा  लागला. उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा इथल्या शहीद विजय सिंह पथिक स्टेडियममध्ये आयोजित हा सामना एकही चेंडू टाकल्याविनाच रद्द होण्याची शक्यता असून उद्या सकाळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं सामनाधिकारी जवगल श्रीनाथ यांनी सांगितलं. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळातर्फे होणाऱ्या सामन्यांसाठी ग्रेटर नोएडातलं हे मैदान वापरलं जातं.

August 8, 2024 10:52 AM

views 61

भारत – श्रीलंका अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव

श्रीलंकेकडून काल ओडीआय मालिकेमद्धे तिसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामाना करावा लागला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून भारतासमोर 249 धावांच आव्हान ठेवलं होतं परंतु 138 धावांमध्येच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. पहिला सामना बरोबरीत संपल्यानंतर दूसरा सामना श्रीलंकेनं 32 धावांनी जिंकला. 27 वर्षांनंतर श्रीलंकेला भरताविरुद्धची ही मालिका आपल्या नवे करण्यात यश आलं आहे.