May 12, 2025 6:30 PM

views 29

सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. ते मुंबईत, सहकाराचं सक्षमीकरण आणि शासनाचं धोरण या विषयावर आयोजित परिसंवादात बोलत होते. सहकार चळवळीचं सिंहावलोकन करुन त्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण अधिक प्रगतिशील करण्यासाठी आणि सामान्य शेतकऱ्यालाही यात जोडून घेण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.    राज्य सरकारनं  केंद्र सरकारच्या सहाय्यानं राज्यात स्मार्ट आणि ऍग्री बिझनेस प्रकल्प सुरु केले असून दहा हज...

May 11, 2025 3:33 PM

views 40

राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथे राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजन केलं. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा त्याच तेजाने, त्याच स्वाभिमानाने आणि त्याहीपेक्षा भव्यतेने उभा राहिला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सोहळ्यानंतर दिली.   कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या विविध वादळांच...

May 10, 2025 8:06 PM

views 58

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची २८वी बैठक आज मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं पार पडली. तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर दोन्ही राज्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या कार्यक्रमाला उपस्थित होते. तापी मेगा रिचार्ज जगातलं एक आश्चर्य आहे. या परियोजनेमुळे महाराष्ट्राची दोन लाख ३० हजार हेक्टर आणि मध्य प्रदेशची सुमारे एक लाख ३१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, असं मुख्य...

May 9, 2025 8:08 PM

views 29

महत्त्वाच्या पदांवरच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे मॉक ड्रील करण्याचे तसंच जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करण्याचे निर्देश  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातल्या सुरक्षा सज्जतेचा आढावा घेण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.   युद्ध स्थितीत बचावासाठी करण्याच्या विविध हालचालींची माहिती आणि प्रशिक्षण नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ब्लॅकआऊटच्या वेळी विशेषतः रुग्णालयांबर...

May 7, 2025 3:51 PM

views 50

गडचिरोलीत खनिकर्मविषयक अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाचे परदेशी विद्यापीठांबरोबर करार

खनिजसंपन्न गडचिरोली जिल्ह्यात खनिकर्म विषयाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. स्वायत्त 'विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था' स्थापन करण्याबाबत गडचिरोलीचं गोंडवन विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियाचं कार्टीन विद्यापीठ यांच्यात आज यासंदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. मुंबईत राजभवन इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला. 

April 30, 2025 8:53 PM

views 48

जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्वागत केलं आहे. यामुळे गरजू नागरिकांच्या प्रगतीसाठी धोरणं आखायला यामुळे मदत होईल, असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल आहे, असं त्यांनी म्हटलंय.    तर, केंद्र सरकारनं घेतलेला जात जनगणनेचा निर्णय फसवा असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली...

April 29, 2025 3:24 PM

views 29

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपये अर्थसहाय्य देणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.    राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण आणि रोजगारासाठी मदत करणार असल्याचंही सरकारनं सांगितलं. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली

April 28, 2025 8:48 PM

views 38

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

शासनाच्या सर्व सेवा येत्या १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत, ते आज मुंबईत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती’ आणि ‘प्रथम सेवा हक्क’ दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात बोलत होते.     महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. शासनाच्या ज्या विभागाच्या सेवा १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या ऑनलाईन होणार नाहीत, त्या विभागाला दररोज प्रत्येक सेवेसाठी एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल...

April 28, 2025 3:13 PM

views 58

सरकारने जर संविधानाने दिलेले अधिकार मानले नाहीत, तर त्याविरोधात लोकसेवा हक्क अस्तित्वात आहे- मुख्यमंत्री

लोकशाही व्यवस्थेत सरकारने जर संविधानाने दिलेले अधिकार मानले नाहीत, तर त्याविरोधात दाद मागण्यासाठी लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अस्तित्वात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात हजारपेक्षा जास्त सेवा या कायद्यांतर्गत अधिसूचित केल्या असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यातल्या बहुतेक सेवा या ऑनलाईन तत्वावरही राबवल्या जाणार आहेत. या संदर्भात मेटाशी संपर्क ...

April 27, 2025 1:35 PM

views 51

पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांपैकी कुणीही बेपत्ता नसून या सर्व नागरिकांना देशाबाहेर काढायची प्रक्रिया सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना दिली. गृहविभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या एकंदर ४८ शहरांमध्ये ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक राहतात. या सर्व नागरिकांना आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत देशातून बाहेर काढलं जाईल, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.