June 20, 2025 6:44 PM

views 35

आदिवासी गावांमध्ये १७  योजनांची अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री फडणवीस

‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी गावांमध्ये १७  योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. जळगाव जिल्ह्यात धरणगावात उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचं उद्घाटन आणि जामनेर तालुक्यात गोद्री फत्तेपूर इथं गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी पाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं ई-भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आज झालं. त्यावेळी ते बोलत होते.   धरणगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्ण...

June 17, 2025 6:45 PM

views 39

विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री फडनवीस यांना निमंत्रण

यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनं मुंबईत त्यांची भेट घेऊन निमंत्रण दिलं आहे. येत्या ६ जुलै रोजी पहाटे २ वाजून २० मिनिटांनी मुख्यमंत्री फडनवीस सपत्निक, तसंच मानाच्या वारकरी जोडप्यासह विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करतील. 

June 10, 2025 3:09 PM

views 35

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीशील आणि निर्णयक्षम सरकार – मुख्यमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीशील आणि निर्णयक्षम सरकार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी सरकारने देशातला भ्रष्टाचार संपवत विकास आणि सर्वसमावेशकतेच्या आधारे सरकार चालवलं असं मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने एका वर्षात ३० लाख घरं देण्याचा विक्रम केला, ८१ कोट...

June 10, 2025 3:14 PM

views 51

पिंपरी चिंचवड ठरली भांडवली बाजारातून निधी उभारणारी देशातली पहिली महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडवली बाजारातून निधी देशातली पहिली महानगरपालिका ठरल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हरित कर्जरोखे लिस्टिंग कार्यक्रम मुंबई इथं मुंबई शेअर बाजाराच्या सभागृहात आज झाला तेव्हा ते बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जारी केलेल्या हरित कर्जरोख्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कर्जरोखे जारी झाल्यानंतर काही मिनिटातच शंभर कोटींची गुंतवणूक झाली. यावरून हरित कर्जरोख्यांवरचा गुंतवणूकदारांचा विश्वास दिसतो, असं फडणवीस म्हण...

June 8, 2025 7:02 PM

views 40

२०३०पर्यंत ५२ टक्के वीज, अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल – मुख्यमंत्री

अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात राज्याने उत्तम काम केलं असून २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के वीज अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातल्या औंध इथं महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ही इमारत हरित इमारतीचा उत्तम नमुना आहे, ऊर्जा बचत करणारी आणि गरज असेल तेवढी ऊर्जा निर्माण करणारी आहे, असं मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.   गेल्या दोन वर्षांत...

June 8, 2025 6:51 PM

views 44

प्राथमिक आरोग्य सेवांचं जाळं निर्माण करण्यावर विशेष लक्ष – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरचा ताण कमी होत असल्यामुळे, संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचं जाळं निर्माण करण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात आंबी-तरंगवाडी इथे पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते.  त्यादृष्टीनं राज्यातल्या आरोग्य सेवेची पुर्नरचना करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, असं त्यांनी  नमूद केलं. 

June 5, 2025 6:44 PM

views 89

समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून महाराष्ट्राच्या समृद्धीचा आर्थिक कॉरिडॉर आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७५ किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.   राज्यातले २४ जिल्हे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाने राज्याचं एकीकरण केलं. लवकरच हा महामार्ग नव्याने तयार होत असलेल्या वाढवण बंदराशीही जोडला जाईल, यामुळे बंदर-केंद्रित व...

June 3, 2025 7:39 PM

views 61

राज्यातल्या ३० लाख बेघर जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य – मुख्यमंत्री

राज्यातल्या ३० लाख बेघर जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण लाभार्थी मेळावा आज पुण्यामध्ये झाला त्यावेळी ते बोलत होते. या घरांसाठी ८० हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद केंद्र सरकारने केली असून राज्य सरकारतर्फे प्रत्येक लाभार्थ्याला ५० हजार रुपयांचं अनुदान देणार असल्याचं ते पुढे म्हणाले. यावेळी केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री...

May 23, 2025 3:21 PM

views 873

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल – मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. कोल्हापूर विमानतळावर ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.    पुण्यातल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले की या प्रकरणी दोन संशयितांना  पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी मोक्का लावण्याकरिता नियम पहावे लागतील, मात्र कायद्यातून कोणीही सुटणार नाही याची काळजी घेऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं.    इचलकरंजी विधानसभा मतदारसं...

May 14, 2025 7:30 PM

views 41

ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याची शक्ती जगाला समजली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दक्षिण मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून आज मुंबई भाजपाने तिरंगा यात्रा काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यात सहभागी झाले होते. ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याची शक्ती जगाला समजली, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पहलगाममधे दहशतवाद्यांनी अतिशय निर्घृणपणे नागरिकांची हत्या केली. त्यामुळे दहशतवाद्यांना नेस्तनाबूत  करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. यात दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले, असं मुख्यमंंत्र्यांनी सांगितलं.   पाकिस...