July 2, 2025 8:07 PM

views 54

गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी नवीन फौजदारी संहिता कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक-मुख्यमंत्री

गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं करता यावा यासाठी नवीन फौजदारी संहिता कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. विधानभवन येथे नवीन फौजदारी संहिता कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आज विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय कामं श्रेणीबद्ध करावीत, असंही ते म्हणाले.    नवीन फौजदारी कायद्यांमुळे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करता येत असल्याचं ते म्हणाले. गुन्हे सिद्ध करण्यास...

July 2, 2025 1:48 PM

views 52

महाराष्ट्रात वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य वाढवून देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांचं आश्वासन

वीज कोसळून मृत्यू झालेले शेतकरी शेतमजूर यांच्या कुटुंबांना १० लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. आपत्ती व्यवस्थापनाच्या कक्षेत वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता, आता तो करण्यात आला आहे, असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. मदत निधी वाढवून देण्याबाबत सूचनांचा विचार करून, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन महाजन यांनी दिलं. राज्यातल्या विविध विकास कामांमधे मेघा इंजिनियरिंग या कंपनीनं ३ हजार कोटींचा भ्...

July 2, 2025 8:57 AM

views 52

आर्थिक लाभाच्या फसव्या योजनांच्या बाबतीत नागरिकांनी दक्षता घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन

राज्यात अधिक व्याजदराचं आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनीही अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केलं. भिमराव तापकीर यांनी उपस्थित केलेल्या प्रशाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले. बीड इथल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘एसआयटी’ची स...

June 29, 2025 8:45 PM

views 56

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी, ती कोणती असावी, कशी शिकवली जावी, यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर त्यानुसार पुढचा निर्णय घेऊ, ...

June 29, 2025 7:30 PM

views 185

त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची घोषणा

शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी, ती कोणती असावी, कशी शिकवली जावी, यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचंही फडणवीस यांनी जाहीर केलं. विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकला आणि सरकारला एक पत्रही दिलं. मात्र विरोधकांकडे कोणतेही नवे मु...

June 27, 2025 7:03 PM

views 63

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे-मुख्यमंत्री

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जन प्रथा परंपरेनुसार व्हावं, यासाठी पर्यावरणाचा दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले आणि न्यायालयात टिकेल असं धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात बैठक झाली.

June 27, 2025 9:52 AM

views 51

शक्तीपीठ महामार्गामुळं मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यास मदत-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

एक महामार्ग अर्थव्यवस्थेची अनेक दालनं उघडी करतो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत केलं आहे. शक्तीपीठ महामार्गामुळं मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यास मदत होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. महामार्गाच्या प्रत्येक १०० किलोमीटर अंतरावर पाचशे ते एक हजार शेततळी तयार करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  

June 13, 2025 8:24 PM

views 34

नागपूरमध्ये सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभा राहणार

नागपूरमध्ये सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभा राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मॅक्स एअरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य शासनाच्या उद्योग विभाग यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. कारखान्याचं प्रत्यक्ष काम २०२६ पासून सुरू होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सुमारे दोन हजार रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पात आठ वर्षांमध्ये ८ हजार कोटींची ...

June 10, 2025 8:11 PM

views 50

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीशील आणि निर्णयक्षम-मुख्यमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीशील आणि निर्णयक्षम सरकार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी सरकारने देशातला भ्रष्टाचार संपवत विकास आणि सर्वसमावेशकतेच्या आधारे सरकार चालवलं असं मुख्यमंत्री म्हणाले.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने एका वर्षात ३० लाख घरं देण्याचा विक्रम केला...

June 6, 2025 7:31 PM

views 82

एक कोटी रुपयांहून अधिक बक्षिस असलेल्या १२ नक्षलवाद्यांचे गडचिरोलीत आत्मसमर्पण, शरण आलेल्या १३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गडचिरोली पोलिस मुख्यालयात १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर सुमारे १ कोटी १२ लाख रुपयांचे बक्षीस होतं. यावेळी आत्मसमर्पण केलेल्या १३ नक्षलवाद्यांचा सामुदायिक विवाह लावून देण्यात आला. नक्षलवादाच्या विरोधात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला असून, नक्षलवादाविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.