September 8, 2025 8:34 PM

views 54

भविष्यातली राज्याची धोरणं आखून विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार होईल-मुख्यमंत्री

व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वं आहेत, या व्हिजन नुसार भविष्यातली राज्याची धोरणं आखून विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ बाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत बोलत  होते.  आपण योग्य मार्गावर आहोत. पुढच्या वीस-पंचवीस वर्षांसाठीचा आराखडा तयार होतो आहे. केवळ कागदोपत्री सादरीकरण न राहता ते प्रत्यक्षात साध्य व्हावं, यासाठी आपली संपूर्ण क्षमता...

August 29, 2025 11:22 AM

views 83

मराठा किंवा ओबीसी समाजावर अन्याय न करता दोन्ही समाजाचे प्रश्न सोडवण्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

मराठा किंवा ओबीसी दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, दोन्ही समाजाचे प्रश्न शासन सोडवेल, या पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केला. कोणत्याही समाजाचे हक्क काढून दुसऱ्या समाजाला दिले जाणार नाहीत, दोघांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे, असं फडनवीस म्हणाले.    दहा टक्के आरक्षण दिल्यावरही मराठा समाजाच्या आंदोलनाचं कारण कळलेलं नाही. लोकशाहीच्या चौकटीत या मागणीवर काय तोडगा काढता येईल ते पाहू. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यावर मराठा समाजाला कितपत फायदा मिळेल याबाबत शंका आहे, त्यामुळे...

August 14, 2025 3:28 PM

views 95

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या ५५६ सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

पुनर्विकास करण्यासाठी विकासकाची गरज नाही, तर म्हाडासारखी यंत्रणा उत्तम पद्धतीने पुनर्विकास करू शकते, हे बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाने सिद्ध केलं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या ५५६ सदनिकांचं वितरण त्यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. बीडीडी चाळ म्हणजे मुंबईच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा जिवंत इतिहास आहे, तिच्या पुनर्विकासाची वर्षानुवर्षं प्रलंबित असलेली मागणी या सरकारने पूर्ण केली, असं ते म्हणाले. या धर्तीवर धारावी पुनर्वि...

August 7, 2025 7:52 PM

views 37

अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयात शुल्काचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मुंबईत उच्चस्तरीय बैठक

अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयात शुल्काचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेतली.    अमेरिकेच्या शुल्कवाढ धोरणामुळे राज्यातील निर्यातप्रधान उद्योगांवर होणारे  संभाव्य परिणाम, तसंच जागतिक बाजारातील स्पर्धात्मकतेवर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातील उद्योगांचं हित आणि अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारशी तातडीने समन्वय साधून आवश्यक उपाययोजना...

August 4, 2025 8:23 PM

views 63

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०१७ मधल्या ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात येणार – मुख्यमंत्री

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०१७मधल्या स्थितीनुसार ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२२ च्या प्रभाग रचनेनुसार घ्याव्या अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असल्याने २०१७ मधल्या ओबीसी आरक्षणानुसार सर्व जिल्ह्यांमधे निवडणुका होतील, असं ते म्हणाले.   मुंबई महानगर क्षेत्रातल्या आणि इतर अशा ३३ पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचा आढावा आजच्या व...

August 2, 2025 8:28 PM

views 64

विश्वचषक बुद्धिबळ विजेती दिव्या देशमुखचा सत्कार

ग्रँडमास्टर दिव्या देशमुखनं बुद्धिबळ या खेळातलं चीनचं वर्चस्व मोडीत काढलं याबद्दल एक भारतीय म्हणून तिचा अभिमान वाटत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ विजेती दिव्या देशमुख हिचा आज नागपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार झाला त्यावेळी ते बोलत होते. तीन  कोटी रुपयांचा धनादेश, स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी चेस असोसिएशनतर्फेही दिव्या देशमुखला ११ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.    सरन्यायाधीश न्...

August 2, 2025 8:08 PM

views 37

संविधानानं सर्वांना समान संधी देणारी व्यवस्था तयार केल्याचं मुख्यमंत्र्यांचं नागपूरमधे प्रतिपादन

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं  देशात समतेचं राज्य निर्माण करण्यासह, सर्वांना समान संधी आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नपूर्तीसाठी व्यवस्था तयार करण्याचं काम केलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  नागपूर इथल्या डॉ आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात ते आज बोलत होते.    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला वारसा पुढे नेण्याचं कार्य हे महाविद्यालयानं सातत्यानं करत असून ६ हजाराहून अधिक विद्यार्थी असलेल्या या महाविद्यालयानं हजारो वं...

July 24, 2025 8:17 PM

views 42

कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य व संस्कृती विशेष केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करता यावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राची पायाभरणी आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य व संस्कृती विशेष केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे युद्धनीतीचा अवलंब केला, त्या युद्धनीतीतून त्यांची सामरिक शक्ती झळकते. ही युद्धनीती वापरूनच पुढच्या मराठेशाहीत देशभरात मराठ्यांचा बोलबाला झाला. याच सामरिक शक्तीच्या अभ्यासासाठीचं अध्...

July 22, 2025 6:58 PM

views 33

गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन

गडचिरोली इथं विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज झालं. यात एम टी पी ए स्टील प्रकल्प, कोनसरी इथलं शंभर खाटांचं रुग्णालय, सी बी एस ई शाळेची पायाभरणी, सोमनपल्ली इथं लॉयड्स टाऊनशिप, हेडरी ते कोनसरी स्लरी पाईपलान यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे १४ हजार जणांना रोजगार मिळाला असून आणखी वीस हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. यामुळे गडचिरोलीचं चित्र पालटलं आहे, गडचिरोलीच्या जल आणि जंगलाचं संगोपन करण्याचा प्र...

July 6, 2025 7:26 PM

views 68

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती देण्याचं विठ्ठलचरणी साकडं

पांडुरंगाने राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गानं चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी, समाधानी ठेवण्यासाठी आशीर्वाद द्यावा, असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विठ्ठलाला घातलं. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे मानाच्या वारकरी दांपत्यासह फडनवीस यांनी सपत्निक, विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि इतर यावेळी उपस्थित होते. सर्व विठ्ठल...