January 2, 2025 3:55 PM

views 58

नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांकडून प्रशंसा

दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. यामुळे या भागातल्या जीवन सुलभतेला चालना मिळेल, आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, असं त्यांनी समाजमाध्यमवरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. गडचिरोली इथं काल ११ नक्षली अतिरेक्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी गडचिरोलीतल्या नागरिकांचं विशेष अभिनंदन केलं आहे.

January 2, 2025 10:04 AM

views 54

गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू – मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डी आर आय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनाण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले. ‘‘कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा...

January 2, 2025 9:55 AM

views 47

गडचिरोलीत 11 नक्षली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शरण

गडचिरोली इथं विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह 11 नक्षल्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शरणागती पत्करली. तारक्का मागील 38 वर्षांपासून नक्षल चळवळीत होती. संविधानविरोधी आणि देशविरोधी कृत्यामुळे आपला विकास होत नाही हे नक्षल्यांच्या लक्षात आल्यामुळे अनेक जण देशाची व्यवस्था आणि संविधानावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहात येत आहेत असं फडणवीस यावेळी म्हणाले. याप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. फडणवीस यांनी भामरागड तालुक्यातील पेनगुं...

January 1, 2025 10:04 AM

views 73

जल जीवन मिशन योजनेची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालही पुढील शंभर दिवसांत करायच्या कामांच्या अनुषंगानं विविध विभागांची आढावा बैठक घेतली. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या कामांचा आढावा घेताना जल जीवन मिशन योजनेची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. ही योजना संपूर्णपणे सौरउर्जेवर चालवावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सहकार विभागाचा आढावादेखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा, रिमोट सेन्सिंग आणि जिओग्राफिक्स इन्फॉर्मेश...