February 7, 2025 7:24 PM

views 47

देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन

देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात, गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडनवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ २०२५ औद्योगिक महोत्सवाचं’ उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या 'पोलाद क्रांती'चा फायदा या संपूर्ण प्रदेशाला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ वर्षांत गडचिरोली हे देशाचं पोलाद उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येईल, असा ...

February 5, 2025 8:18 PM

views 60

येत्या ५ वर्षात सर्वांचं वीज बिल कमी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

येत्या पाच वर्षात वीज बिल कमी करुन सर्व ग्राहकांना दिलासा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. बीडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. ऊर्जा विभागाने पुढच्या पाच वर्षाचे वीजेचे दर काय असतील, याची पिटीशन दाखल केली. त्यामुळे घरगुती आणि औद्योगिक वीजेचे दर कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री सौर कृषी वीज योजनेचं काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल, आणि राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना लागणारा १६ हजार मेगावॅट वीज पुरवठा दिवसा केला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्...

February 3, 2025 8:43 PM

views 48

जलसंधारणाच्या जुन्या प्रकल्पांच्या दुरुस्ती, देखभालीकरिता नवीन धोरण आणणार

जलसंधारणाच्या जुन्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती आणि  देखभालीकरिता राज्य शासन नवीन धोरण आणणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही माहिती दिली.  मृद व जल संधारण विभाग आणि विविध संस्था- संघटना यांच्यामध्ये आज तीन सामंजस्य करार करण्यात आले , त्यावेळी ते बोलत होते. आजवर रखडलेले प्रकल्प नवीन धोरणामुळे प्राधान्यानं पूर्ण होतील, तसंच कमी खर्चात अधिक काम पूर्ण होऊन  जलसंधारणाचा प्रभावी वापर होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.    नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि भारती...

February 2, 2025 8:12 PM

views 50

आदिवासीबहुल भागांमधलं सर्व प्रकारचं मागासलेपण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

आदिवासीबहुल भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागसलेपण दूर करणं सर्वांत मोठं आव्हान असून सरकार त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपूर मध्ये एम्स इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीनं आयोजित फिस्ट २०२५ या परिषदेच्या उद्घाटनावेळी गडकरी आज बोलत होते.   सेवा आणि उत्पादन क्षेत्राचं जीडीपीमधलं योगदान वाढवण्यासाठी सरकारनं दुर्गम भागांना प्राधान्य दिलं आहे, आदिवासीबहुल भागाच्या सर्वसमा...

February 2, 2025 7:45 PM

views 51

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला – मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व आणि कलशारोहण सोहळ्यात ते आज बोलत होते. चक्रधऱ स्वामी आणि त्यांच्या अनुयायांनी विपरित परिस्थितीत धर्म रक्षणाचं कार्य केलं, असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं महानुभाव पंथाच्या अनेक मंदिराचा विकास केला आहे, तसंच रिद्धपूर पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंदप्रभू देवस्थान या ठिकाणीही संवर्धनाच...

January 30, 2025 5:23 PM

views 31

नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही अभिमानाची गोष्ट – मुख्यमंत्री

नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.    ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवी दिल्ली इथल्या कार्यालयाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच देशाच्या राजधानीत हे भव्य संमेलन होत असून ते यशस्वी व्हावं, अशा शुभेच्छाही फडणवीस यांनी दिल्या. 

January 27, 2025 6:50 PM

views 40

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २१ फॉरेन्सिक वाहनांंचं लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज २१ मोबाइल फॉरेन्सिक वाहनांंचं लोकार्पण केलं. या वाहनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीनं पुरावे गोळा करण्याची आणि साठवण्याची व्यवस्था असल्याचं मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण सोहळ्यानंतर बोलताना सांगितलं. सबळ पुरावे नसल्यानं किंवा पुराव्यांसोबत छेडछाड झाल्यामुळे गुन्हेगार सुटण्याचं प्रमाण या वाहनांमुळे कमी होईल, असं ते म्हणाले.    राज्यात अशी एकूण २५६ फॉरेन्सिक वाहनं तयार केली जाणार आहेत. भारतीय साक्ष कायद्यानुसार गुन्ह्यातल्या पुराव्यांसाठी शा...

January 14, 2025 9:00 PM

views 39

पानिपतच्या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल-मुख्यमंत्री

पानिपतच्या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. ते आज पानिपत युध्दाला २६४ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त पानिपत इथं आयोजित मराठा शौर्य दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.    या स्मारकासाठी अधिकची जमीन आवश्यक असल्यानं त्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, तसंच या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही राज्य शासनातर्फे उभारला जाईल, अशी घोषणाही फडनवीस यांनी केली.

January 13, 2025 8:41 PM

views 55

शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन तत्परतेने सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेनं सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत. आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागानं करायच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज घेतला. राज्यातल्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतीनं करा, राज्यातल्या महामार्गांची उभारणी, तसंच रस्त्यांचं जाळं दर्जेदार आणि अधिक व्यापक करण्याच्या दृष्ट...

January 13, 2025 8:37 PM

views 49

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. पणन विभागाच्या १०० दिवसांच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. समृध्दी महामार्गालगत ऍग्रो हब उभारा, कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळींची संख्या वाढवा असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.    नवी मुंबईत शेतमालासाठी महा बाजार उभारण्याचं नियोजन आहे. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान दोनशे ते अडीचशे एकर जागेत हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचं अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी सांगितले. राज...