January 23, 2025 9:18 PM

views 37

छत्तीसगड : सायबर फसवणूक प्रकरणी ६२ जणांना अटक

सायबर फसवणूक प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी एक मोठी मोहीम राबवत ६२ जणांना अटक केली आहे. या मोहिमेत छत्तीसगड, राजस्थान आणि ओदिशा या राज्यांमधल्या सुमारे ४० ठिकाणांवर पोलिसांनी छापे घातले. त्यात अटक केलेल्यांमधे नायजेरियाच्या तीन नागरिकांचा समावेश आहे. ऑपरेशन सायबर शिल्ड या नावानं राबवलेल्या या मोहिमेत १०० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग होता, असं रायपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी सांगितलं.

January 21, 2025 7:08 PM

views 69

छत्तीसगड आणि ओदिशात २३ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यात आणि ओदिशामधल्या नुआपाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या कारवाईत २३ नक्षलवादी मारले गेले. त्यात नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जयराम उर्फ चलपती याचाही समावेश आहे. त्याच्यावर १ कोटी रुपयांचं बक्षीस होतं.   या कारवाईत ठार झालेल्या दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह काल, तर १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह आज ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा दलाने घटनास्थळावरून एका रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलीस आज या परिसरात व्यापक शोधमोहीम राबवत आहेत.   नक्ष...

January 19, 2025 8:15 PM

views 40

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ३ माओवाद्यांना अटक

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलिसांनी जिल्हा राखीव पोलिसांच्या सहकार्यानं ३ माओवाद्यांना अटक केली. यापैकी एका नक्षली अतिरेक्यावर  २ लाख तर दुसऱ्या एकावर १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं. पोलिसांनी या भागातल्या जंगलात घेराबंदी करून या तिघांना ताब्यात घेतलं.

January 16, 2025 8:14 PM

views 35

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या बीजापूर जिल्हयात बस्तरच्या जंगलात सुरु असलेल्या चकमकीत किमान १२ माओवादी मारले गेले आहेत. बीजापूर जिल्ह्याच्या तेलंगणा सीमेवरील दक्षिण बस्तर च्या जंगलात आज सकाळी ९ वाजल्यापासून ही चकमक सुरू होती. या जंगलात मोठ्या प्रमाणात माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल, कोब्रा बटालियन आणि जिल्हा राखीव सुरक्षा रक्षकांच्या पथकानं संयुक्तपणे ही कारवाई सुरु केली.

January 12, 2025 1:45 PM

views 75

छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी

छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. बिजापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय उद्यानात माओवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यावर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनं शोध मोहिम राबवली. या अभियानात मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा हस्तगत करण्यात आला असून यात स्वयंचलित शस्त्रास्त्रांचाही समावेश आहे. या विभागात शोध अभियान अजूनही सुरु आहे.

January 10, 2025 1:07 PM

views 32

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात १३ माओवाद्यांची शरणागती

छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात १३ माओवाद्यांनी पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. या माओवाद्यांवर एकूण १३ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये देण्यात आले आहेत.

January 9, 2025 8:14 PM

views 38

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ३ नक्षली ठार

छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ३ नक्षली ठार झाले. सुकमा आणि विजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवरच्या जंगलात जिल्हा राखीव पोलीस दल, विशेष कृती दल आणि कोब्रा बटालियनचं संयुक्त पथक नक्षली विरोधी मोहिमेवर असताना ही चकमक सुरू झाली. बराच वेळ ही चकमक सुरु होती.

January 5, 2025 12:58 PM

views 32

छत्तीसगढ : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ४ माओवादी ठार, एक जवान शहीद

छत्तीसगढमधे सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत किमान ४ माओवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे. या चकमकीत एक सुरक्षा जवान शहीद झाला.

December 13, 2024 1:44 PM

views 36

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

त्तीसगडमध्ये आज सुरक्षादलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. बिजापूर जिल्ह्यातल्या बासुगुडा भागात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कोब्रा बटालियन आणि जिल्हा राखीव दलाने संयुक्त शोध मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान नेंद्रा जंगलात चकमक झाली. चकमकीनंतर सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी जप्त केला.

December 12, 2024 4:06 PM

views 34

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ७ माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी आज झालेल्या चकमकीत सात माओवादी ठार झाले. नारायणपूर जिल्ह्यातल्या दक्षिण अबोझमद भागात केंद्रीय राखीव पोलीस दल, विशेष तपास पथक आणि जिल्हा राखीव दल यांनी संयुक्तपणे राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी ही चकमक झाली. या माओवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून परिसरात गोळीबार आणि शोधमोहीम अजूनही सुरू आहे.