November 22, 2024 1:40 PM

views 52

छत्तीसगडमध्ये सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत १० माओवादी ठार

छत्तीसगड मधे सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत आज किमान १० माओवादी ठार झाले. सुकमा जिल्ह्यातल्या कोंटा परिसरात माओवादी अतिरेकी दडून बसले असल्याची खबर मिळाल्यावरुन केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा राखीव सुरक्षा दलानं संयुक्त शोधमोहीम सुरु केली होती. त्या दरम्यान भेज्जी परिसरात झालेल्या गोळीबारात हे अतिरेकी मारले गेले. सुरक्षा दलांनी १० जणांचे मृतदेह शोधले असून त्यांच्याजवळून एके -47 सह मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. सुरक्षादलांची मोहीम अद्याप सुरु आहे.  मार्च २०२६ पर्य...

November 16, 2024 7:56 PM

views 48

छत्तीसगढमधे सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार

छत्तीसगढमधे नारायणपूर जिल्ह्यातल्या अबुझमाड इथे आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार झाले. यात २ महिलांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहेत. याशिवाय चकमकीच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या चकमकीत २ सुरक्षा जवानही जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून  आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

November 3, 2024 12:46 PM

views 84

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी हवालदार जखमी झाले आहेत. जागरगुंडा या गावात आठवडी बाजारात तैनात असलेल्या या दोघांवर माओवाद्यांनी आज हल्ला केला. जखमी हवालदारांना प्रथमोपचारानंतर पुढच्या उपचारांसाठी हवाई मार्गानं हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतर या भागात शोधमोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.

September 15, 2024 7:54 PM

views 49

छत्तीसगडमधे चेटूक करत असल्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातल्या ५ जणांची हत्या

छत्तीसगडमधे सुकमा जिल्ह्यात चेटूक करत असल्याच्या संशयावरुन एकाच कुटुंबातल्या पाच जणांची आज हत्या करण्यात आली. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. कोंटा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ईटकला गावात हा प्रकार घडल्याचं समजल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस पथक घटनास्थळी पोचलं. याप्रकरणी त्यांनी पाच जणांना अटक केली आहे. अधिक तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

September 3, 2024 8:05 PM

views 50

छत्तीसगडमधे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ९ माओवादी ठार

छत्तीसगडमधे, आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ९ माओवादी मारले गेले. बस्तर विभागातल्या दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर ही चकमक उडाली. या भागात मोठ्या संख्येनं माओवादी असल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. त्यानुसार केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा राखीव सुरक्षारक्षकांचं संयुक्त पथक एंद्री गावाजवळ त्या भागात पाठवलं. त्यांची शोधमोहिम सुरु असताना माओवाद्यांशी त्यांची चकमक उडाली. चकमकीनंतर ९ माओवाद्यांचे मृतदेह तसंच काही शस्त्रास्त्र सापडली. शोधमोहिम अजूनही सुरु आहे.

July 18, 2024 3:10 PM

views 50

छत्तीसगडमधे नक्षलविरोधी मोहिमेत २ जवान शहीद

छत्तीसगडमध्ये विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेजवळ काल रात्री माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलिसांच्या विशेष कार्यदलाचे दोन जवान शहीद झाले. या परिसरात माओवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरु होती. त्यावेळी माओवाद्यांनी आई.ई.डी.चा स्फोट केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या चार जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

July 3, 2024 1:46 PM

views 47

छत्तीसगढमध्ये सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी काल झालेल्या चकमकीत नारायणपूर जिल्ह्यात पाच माओवादी ठार झाले. महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर माओवाद्यांनी हल्ला करत बेछूट गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाच माओवादी ठार झाले. दरम्यान, सुरक्षा दलांनी राज्यातल्या सुकमा जिल्ह्यातल्या विविध भागातून नऊ माओवाद्यांना अटक केली, तर सुकमा जिल्ह्यात एका महिलेसह दोन माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे.