March 25, 2025 8:17 PM

views 42

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ३ माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. यांपैकी एक जण दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा सदस्य म्हणून कार्यरत होता. सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचं दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितलं.

March 23, 2025 8:19 PM

views 32

छत्तीसगढमधे माओवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात दोन जवान जखमी

छत्तीसगढमधे बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. हा स्फोट बिजापूर-भोपाळपट्टनम राष्ट्रीय महामार्गावर मादेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. या स्फोटामुळे रस्त्यावर पाच फूट खोल खड्डा निर्माण झाला असून जखमी जवांनावर मादेडमधल्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.  

March 23, 2025 1:40 PM

views 44

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या अड्ड्यांवरुन शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा साठा जप्त

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात पोलिसांनी माओवाद्यांच्या अड्ड्यांवरुन शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा  साठा जप्त केला. या बाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी सुरक्षा दलाच्या मदतीनं मार्कनगुडा गावाजवळ  टेकडीवरच्या जंगलात लपवलेला शस्त्रसाठा हस्तगत केला. माओवाद्यांनी केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दल आणि कमांडोच्या तुकड्या या कारवाईत सहभागी झाल्या होत्या. गस्तीवर असलेल्या सुरक्षा दलाच्या तुकड्यांवर  हल्ला करण्याच्या उद्देशानं हा साठा माओवाद्यांनी लपवून ठेवला होता, अशी माहिती  सूत्रांनी दिली आहे. 

March 21, 2025 9:27 AM

views 38

छत्तीसगढमध्ये झालेल्या चकमकींमध्ये ३० माओवादी ठार

छत्तीसगढमध्ये नक्षलग्रस्त भागात झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमधे ३० माओवादी ठार झाले, तर जिल्हा राखीव दलाच्या एका जवानाला वीरमरण आलं. बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमाभागात माओवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानं सुरक्षा दलांची संयुक्त पथकं शोधमोहीम राबवत होती. त्यावेळी गंगलूर भागात ही चकमक उडाली. या चकमकीत २६ नक्षली दहशतवादी ठार झाले. या ठिकाणी शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. या मोहिमेत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. दुसऱ्या घटनेत, कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलं आणि माओ...

March 20, 2025 7:27 PM

views 41

छत्तीसगढमध्ये झालेल्या चकमकीत ३० माओवादी ठार

छत्तीसगढमधे नक्षलग्रस्त भागात झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमधे ३० माओवादी ठार झाले, तर जिल्हा राखीव दलाचा एक जवान शहीद झाला.. बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमाभागात माओवादी लपून बसलेले असल्याची खबर मिळाल्यावरुन सुरक्षा दलांची संयुक्त पथकं शोधमोहीम राबवत होती. त्यावेळी गंगलूर भागात ही चकमक उडाली.   या चकमकीत २६ नक्षली अतिरेकी ठार झाले. त्यांचे मृतदेह मिळाले असून शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. या मोहिमेत सुरक्षा दलाचा एक जवानही शहीद झाला. कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलं...

March 18, 2025 10:26 AM

views 60

छत्तीसगडमध्ये १९ माओवादी शरण

छत्तीसगड मधल्याबिजापूर जिल्ह्यातील १९ माओवाद्यांनी काल पोलीसांपुढे शरणागती पत्करली. जिल्हा पोलिस निरीक्षक जितेंद्रकुमार यादव यांनी संगितल की, आत्मसमर्पण केलेल्या या १९ माओवाद्यांवर एकंदर २९ लाखांच बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. या सर्वांना राज्याच्या पुनर्वसन धोरणानुसार प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, छत्तीसगडच्या कोंडागांव जिल्ह्यातही एका माओवाद्याने काल आत्मसमर्पण केल, त्याच्यावर १ लाख रुपयांच बक्षिस जाहीर करण्यात आल होत. तसच दंतेवाडा जिल्ह्यात मालेवाही भागात काल CRP...

March 16, 2025 2:55 PM

views 44

छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात उभारला पहिला मोबाईल टॉवर !

छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातल्या एका दुर्गम गावात पहिला मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. टेकुलागुडेम गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीत हा टॉवर उभा केला आहे. या टॉवरमुळे या परिसरातल्या दुर्गम गावांना मोबाईल नेटवर्कची सुविधा मिळणार आहे. माओवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी आणि स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी सीआरपीएफने गेल्या वर्षी टेकुलागुडेम इथं छावणी टाकली होती. 

March 14, 2025 10:14 AM

views 57

छत्तीसगडमध्ये १७ नक्षलवादी शरण

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात काल सतरा नक्षलवादयांनी शरणागती पत्करली. त्यापैकी नऊ जणांवर २४ लाख रुपयांचे रोख बक्षीस होतं. पोकळ आदर्शवाद, वरिष्ठ नक्षलवाकडून होत असलेलं निष्पाप आदिवासींचं शोषण आणि सुरक्षा दलांच्या वाढत्या प्रभावामुळे हे नक्षलवादी शरण आले असल्याचं वरिष्ठ पोलिस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितलं.

February 20, 2025 1:38 PM

views 48

छत्तीसगडच्या काही भागात आज सकाळी जोरदार पाऊस

छत्तीसगडच्या काही भागात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागानं राज्यातल्या काही भागात गारपीटीचा इशाराही दिला आहे. रांची, खुंटी, सिमडेगा, पूर्व सिंघभूम, सेराईकेला खारवास या भागात वीजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. 

February 15, 2025 6:58 PM

views 37

छत्तीसगढ महापालिका निवडणूकीत भाजपाचा ऐतिहासिक विजय

छत्तीसगढमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपानं तिथल्या दहाही महानगरपालिकेच्या महापौरपदावर विजय मिळवला आहे. छत्तीसगढमधल्या १० महानगरपालिका, ४९ नगरपरिषदा, ११४ नगरपंचायती आणि १७३ नगरपालिकांसाठी ११ फेब्रुवारीला मतदान झालं होतं. त्याचे निकाल आज जाहीर झाले. महापालिकेच्या बहुतांश प्रभागांमध्येही भाजपाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे किंवा आघाडी घेतली आहे. भाजपानं ३५ नगरपरिषदा आणि ८१ नगरपंचायतींच्या सभापतीपदाची निवडणूकही जिंकली आहे.   या निवडणुकीत काँग्रेसनं आठ नगरपरिषदा आणि ...