July 23, 2025 3:38 PM

views 67

पर्यावरणाच्या दृष्टीनं मोठ्या मूर्तींंचं विसर्जन समुद्रातच करण्याचं राज्य शासनाचं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती समुद्रात विसर्जित करण्यात येतील, असं प्रतिज्ञापत्र आज राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. तसंच, विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येईल, असंही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. पीओपी मूर्तींवरच्या बंदीसंदर्भात राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला होता. या गटाने काही शिफारसी आणि सूचना देणा...

July 10, 2025 8:03 PM

views 63

बेकऱ्यांमध्ये पारंपरिक इंधना ऐवजी हरित इंधनाचा वापर सुरु करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई शहर आणि उपनगरांमधल्या बेकऱ्यांमध्ये पारंपरिक इंधना ऐवजी हरित इंधनाचा वापर सुरु करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं आज मुदतवाढ दिली. तसंच याबाबतची सुनावणी 28 जुलैपर्यंत तहकूब केली.    मुंबई आणि आसपासच्या परिसरात  वायू प्रदूषणाची पातळी गंभीर होत आहे, याबाबत चिंता व्यक्त करत न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठानं महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना सहा महिन्यांमध्ये मुंबईतल्या सर्व बेकर्‍यांमध्ये गॅस अथवा इतर ह...

June 10, 2025 7:26 PM

views 72

मुंबई उच्चन्यायालयाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपणासाठीची तयारी प्रगतीपथावर

मुंबई उच्चन्यायालयाच्या कामकाजाचं (live-streaming ) थेट प्रक्षेपण सुरु करण्यासाठी तयारी प्रगतीपथावर असल्याची माहिती आज मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी दिली. अशा प्रकारची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी सांगितलं की  ५ न्यायपीठांचं कामकाज प्रथम प्रसारणासाठी उपलब्ध होईल.    त्यात मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आराधे आणि न्यायमूर्ती मारणे यांच्या पीठाचा पहिला क्रमांक आहे. रेवती मोहिते- डेरे आणि नीला केदार, एम एस सोनक आणि जि...

April 7, 2025 7:32 PM

views 57

नाशिकच्या काळाराम मंदिराचे अध्यक्ष बदलण्याचे न्यायालयाचे आदेश

नाशिकमधल्या काळाराम मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांना काढून टाकून दुसऱ्या अध्यक्षाची नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. काळाराम मंदिरातल्या पुजाऱ्यांना नैवेद्यासाठी दिली जाणारी रक्कम परत सुरू करण्याची मागणी पुजाऱ्यांनी न्यायालयात केली होती. यासंदर्भात अध्यक्षांनी तडजोडीसाठी बैठक घ्यावी असं न्यायालयाने सूचित केलं होतं. मात्र त्यांनी कार्यवाही केली नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने अध्यक्ष बदलण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसंच पुजारी वर्गाला प्रलंबित रकमेसह १२ टक्के ...

March 31, 2025 3:45 PM

views 78

अपघातग्रस्तांना वैद्यकीय विम्या अंतर्गत मिळालेले पैसे वजा करता येणार नाहीत – मुंबई उच्च न्यायालय

मोटार वाहन कायद्याअंतर्गत अपघातग्रस्तांना मिळणाऱ्या भरपाईतून वैद्यकीय विम्या अंतर्गत मिळालेले पैसे वजा करता येणार नाहीत, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. विमा कंपनीसोबत केलेल्या करारानुसार त्या व्यक्तीला वैद्यकीय विम्या अंतर्गत रक्कम मिळते असं न्यायालयाने सांगितलं. न्यायमूर्ती ए एस चांदुरकर, मिलिंद जाधव आणि गौरी गोडसे यांच्या पीठाने हा निर्णय दिला. एकल आणि खंडपीठाकडून विविध दृष्टीकोन मांडल्यानंतर हे प्रकरण पूर्ण पीठाकडे वर्ग करण्यात आलं.   

March 27, 2025 7:51 PM

views 75

सरकारी रुग्णालयांतल्या मृतांच्या वाढत्या संख्येप्रकरणी तज्ञ समिती नेमण्याचे आदेश

नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या सरकारी रुग्णालयांमध्ये २०२३ साली मृतांच्या संख्येत झालेली वाढ गंभीर असून  या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तज्ञाची समिती नेमण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचं दिले आहेत.  मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांच्या खंडपीठानं दिले आहेत.

March 22, 2025 6:51 PM

views 64

दिशा सॅलियन हिच्या मृत्यशी संबंधित याचिकेची सुनावणी येत्या २ एप्रिलला होणार

दिशा सॅलियन हिच्या मृत्यशी संबंधित घटनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे तसंच इतरांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी येत्या २ एप्रिलला होणार आहे. दिशाचे वडील सतिश सॅलियन यांनी ही याचिका दाखल केली आहे. ८ जून २०२० रोजी दिशानं आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पार्टीत आदित्य ठाकरे तसंच अभिनेते सुरज पांचोली आणि डिनो मोरिया उपस्थित होते. मात्र, या पार्टीनंतर झालेल्या तिच्या मृत्यूनंतर काही अनुत्त...

March 13, 2025 3:47 PM

views 68

फास्टॅगचा अनिवार्य करण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

राज्यातल्या प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅगचा वापर अनिवार्य करणं आणि रोख पैसे दिल्यास दुप्पट शुल्क आकारणं हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा निर्वाळा आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं म्हणत न्यायालयाने फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळली आहे. पुणे इथे राहणाऱ्या अर्जुन खानापुरे यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झा...

March 4, 2025 1:37 PM

views 69

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यावर FIR दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला आज मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विशेष न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी माधवी पुरी बुच यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. त्याविरोधात पुरी यांच्यासह इतर पाच जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत एफआयआर दाखल करण्याचा आदेश रद्द करण्याची विनंती केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत ही विन...

March 3, 2025 3:22 PM

views 68

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी बुच आणि मुंबई शेअर बाजाराच्या दोन अधिकाऱ्यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात माधवी बुच आणि मुंबई शेअर बाजाराच्या दोन अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एफआयआर दाखल करण्याचा आदेश रद्द करावा ठरवण्याची मागणी त्यांनी उच्च न्यायालयाला केली असून आज यावर सुनावणी होत आहे.