November 16, 2024 5:20 PM

views 66

प्रधानमंत्र्यांचा नमो ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्र भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नमो ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ ही या संवादामागची संकल्पना होती. मतदारांना भाजपाच्या संकल्पांची माहिती समजावून सांगून भाजपाला मतदान करण्याचं आवाहन प्रेमानं करावं, असं मोदी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं. महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम आपण अनुभवलं असून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे भाजपासाठी अनुकूल वातावरण अस...

November 15, 2024 6:41 PM

views 51

जातनिहाय जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं काँग्रेसचं भाजपाला आव्हान

जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बाेलत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण  संपवणार असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. काँग्रेसनंच आरक्षण देऊन मागास जातींना हक्क आणि अधिकार दिले, याउलट आरक्षण आणि संविधान संपवण्याचे प्रयत्न भाजपा करत आहे. जातनिहाय जनगणनेला भाजपाचा विरोध आहे, त्यामुळेच प्रधानमंत्री आ...

November 12, 2024 7:30 PM

views 73

भाजपच्या नवनवीन योजनांमुळे देश प्रगतीपथावर – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

भारतीय जनता पक्षाने आपल्या सत्ताकाळात नवनवीन योजना अमलात आणल्यामुळे देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. राज्य सरकारनेही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यात भर टाकली असल्याचं प्रतिपादन भाजपा नेते, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अकोल्यात केलं.

November 12, 2024 7:08 PM

views 58

काँग्रेस मतांसाठी फुटीरवादी शक्तींसोबत कटकारस्थान करत असल्याचा भाजपचा आरोप

महाराष्ट्र आणि झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मतांसाठी फुटीरवादी शक्तींसोबत कटकारस्थान करत असल्याचा आरोप, भाजपानं केलं आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना हा आरोप केला. काँग्रेस आणि इंडिया आघाडीतले पक्ष संकोचित मनोवृत्तीचे असून, अल्पसंख्यकांच्या उन्नतीला देखील त्यांचा विरोध आहे,  असं ते म्हणाले.

November 11, 2024 7:44 PM

views 63

राहुल गांधी अपप्रचार करत असल्याची भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी अपप्रचार करत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपाने आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. गांधी यांनी भाजपावर राज्यघटना नष्ट करत असल्याचा खोटा आरोप करत तणाव निर्माण केल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलं असून आयोगाने यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या सभेदरम्यान राहुल गांधी यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन त्यांना आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अर्जु...

November 11, 2024 3:38 PM

views 49

राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेणं हे भाजपाचं उद्दिष्ट – अनिल सोले

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेणं हे भाजपाचं उद्दिष्ट असं भाजपा नेेते अनिल सोले यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं पक्षाच्या संकल्प पत्राची माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. महायुती सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती यावेळी सोले यांनी दिली. संकल्पपत्र बनवण्यासाठी राज्यभरातल्या ८७७ गावातून ८ हजार ९३५ सूचना आल्या होत्या, त्या सर्वांचा विचार करून हे संकल्पपत्र बनवल्याचं सोले यांनी सांगितलं. भाजपाचं संकल्पपत्र हे महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप ठरेल, असा दावा त्य...

November 10, 2024 6:24 PM

views 53

काँग्रेसने संविधान बदलण्यात येणार असल्याचा विषारी प्रचार चालवलाय – मंत्री नितीन गडकरी

काँग्रेस ने संविधानाचा सोयीनुसार  वापर केला, अवहेलना केली, आणि आता संविधान बदलण्यात येणार असल्याचा विषारी प्रचार चालवला आहे, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केली आहे. यवतमाळमधे राळेगाव इथं ते प्रचारसभेत बोलत होते. त्यामुळे जातीवादी आणि सांप्रदायिक प्रचारापासून दूर रहावं असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.

November 6, 2024 2:02 PM

views 57

भाजपनं राज्यभरातील आपल्या चाळीस पदाधिकाऱ्यांना केलं निलंबित

भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यानं भाजपनं राज्यभरातील आपल्या चाळीस पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. पक्षशिस्त आणि अनुशासन भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचं पक्षानं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

October 31, 2024 2:54 PM

views 79

काँग्रेस नेते रवी राजा यांंचा भाजपात प्रवेश

महायुतीचे तिन्ही पक्षांकडून बंडखोरांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अर्ज परत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते रवी राजा यांंनी आज भाजपात प्रवेश केला, तेव्हा फडणवीस बोलत होते. रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला होईल. रवी राजा यांच्या माध्यमातून काँग्रेसचे अनेकजण भाजपमध्ये येतील, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. रवी राजा शीव कोळीवाडा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र त्यांना डावलण्यात आल्य...

October 24, 2024 1:38 PM

views 70

राजस्थान आणि उत्तरप्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर

राजस्थान आणि उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राजस्थामधल्या चौरासी विधानसभा मतदारसंघासाठी तर उत्तर प्रदेशमध्ये कुंदरकी, गाझियाबाद, खैर, करहल, फुलपूर, कटेहरी आणि मझवा या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.