July 11, 2024 8:44 PM

views 50

दहा वर्षांच्या कालावधीत भाजपा सरकारनं १२.५ कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या – भाजपा प्रवक्ते

वर्ष २०१४ ते २०२३ या दहा वर्षांच्या कालावधीत भाजपा सरकारनं साडे बारा कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून  दिल्या आहेत, त्यामुळं भारत हा  जगात सर्वाधिक प्रमाणात रोजगार निर्माण करणाऱ्या देशांपैकी एक बनला आहे, अशी माहिती भाजपाच्या प्रवक्त्यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार आणि त्यांची राजकीय इच्छाशक्ती यामुळे हे शक्य झालं आहे. युपीए सरकारच्या काळात दहा वर्षात केवळ २ कोटी ९० लाख रोजगाराच्या संधी  निर्माण झाल्या होत्या, असंही ते म्हणाल...

June 27, 2024 8:58 AM

views 50

आणीबाणीच्या मुद्द्यावरुन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत गोंधळ

१८ व्या लोकसभेचे सभापती म्हणून भारतीय जनता पक्षाचे खासदार ओम बिर्ला यांची काल आवाजी मतदानानं निवड करण्यात आली. सभापती म्हणून संसदीय मूल्यं आणि लोकशाही परंपरांचं पालन करण्याला आपलं प्राधान्य असेल असं बिर्ला यांनी आपल्या आभाराच्या भाषणात सांगितलं. लोकसभेच्या कामकाजात अडथळे आणण्यापेक्षा चर्चेचा मार्ग अवलंबला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी बिर्ला यांचं अभिनंदन केलं.   १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादण्याच...

June 20, 2024 8:27 PM

views 40

राहुल गांधी नीट प्रकरणाचं राजकारण करत आहेत – सुधांशु त्रिवेदी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी काही देणंघेणं नसून ते नीट प्रकरणाचं राजकारण करत आहेत, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी आज केली. सरकार नीट प्रकरणाबाबत संवेदनशील असून विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही. तसंच दोषींवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्रिवेदी यांनी दिली.   त्याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेतल्या अनियमिततेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसंच हे राष्ट्रीय संकट असून सरकारने यावर काहीही प्रतिक्रि...

June 19, 2024 3:47 PM

views 50

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचं नेतृत्त्व करतील – चंद्रशेखर बावनकुळे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपाचे नेते असून तेच राज्याचं नेतृत्त्व करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूर विमानतळावर बातमीदारांशी बोलत होते. सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती भाजपाच्या सर्व आमदारांनी आणि पक्ष सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.   केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी आखलेल्या सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभेच्या निवडणुक...

June 17, 2024 3:44 PM

views 57

विधानसभा निवडणुक : केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांची महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

भारतीय जनता पार्टीनं विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांची महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव राज्याचे निवडणूक सहप्रभारी म्हणून काम पाहतील. हरियाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मिर विधानसभा निवडणुकीसाठीही पक्षानं विविध केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांची प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.  

June 16, 2024 12:51 PM

views 57

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी भाजपची समिती स्थापन

देशाची लोकसभा निवडणुक पार पडल्यानंरत पश्चिम बंगालमध्ये सातत्यानं सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी भाजपनं एक समिती स्थापन केली आहे. खासदार बिप्लब कुमार देब, रविशंकर प्रसाद, ब्रिजलाल आणि कविता पाटीदार या भाजपा नेत्यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या राजकीय हिंसाचारांच्या घटनांविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना अहवाल सादर करणार आहेत.