January 11, 2026 5:46 PM

views 76

निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा लाडक्या बहिणींचा वापर करून घेत आहे- विजय वडेट्टीवर

लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध नाही, पण निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा लाडक्या बहिणींचा वापर करून घेत आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी आज अकोल्यात केली. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणुका घेण्यावरूनही त्यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी भाजपाचीच भाषा बोलतात, असा आरोप त्यांनी केला.  

January 10, 2026 3:05 PM

views 236

तुषार आपटेचा ‘स्वीकृत’ नगरसेवक पदाचा राजीनामा

भारतीय जनता पक्षानं बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला सह-आरोपी तुषार आपटे यांनी ठाणे जिल्ह्यातल्या कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेतल्या 'स्वीकृत' नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. काल त्याची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर विरोधकांनी त्याच्यावर टीका केली होती.    भाजपाचा हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत मुंबई काँग्रेस समितीच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी आज मांडलं. तर, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या सह-आरोपीला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन भाजपानं असंवेदनशीलतेचा कळस गाठला अ...

January 10, 2026 3:11 PM

views 164

मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा

मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. १०० नवे काँक्रीट रस्ते, ३०० खाटांचं पालिका रुग्णालय, प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना इत्यादी आश्वासनं भाजपानं या जाहीरनाम्यातून दिली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मिरा-भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहेत.

January 9, 2026 8:53 PM

views 134

मुंबईच्या २६ भाजप कार्यकर्त्यांचं ६ वर्षांसाठी निलंबन

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे आदेश न मानणाऱ्या मुंबईच्या २६ भाजप कार्यकर्त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या संदर्भात अधिकृत पत्रक जारी केलं आहे. वारंवार समज देऊनही महायुतीच्या उमेदवाराला सहकार्य न केल्यामुळे या कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

January 8, 2026 3:15 PM

views 96

अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश

अंबरनाथ नगरपालिकेतल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित १२ नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत त्यांचा नवी मुंबईत हा कार्यक्रम झाला.    भाजपासोबत युती केल्यानं काँग्रेसनं काल त्यांचं निलंबन केलं होतं. पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता थेट निलंबनाची कारवाई केली, असा आरोप अंबरनाथ कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केला होता.    त्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा काल रात्री रविंद्र चव्हाण यांनी केली होती. अंब...

January 6, 2026 6:02 PM

views 123

TMC Election : भाजपाचा ‘ठाणे निर्धारनामा’ हा जाहीरनामा प्रसिद्ध

भाजपानं ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठीचा ‘ठाणे निर्धारनामा’ हा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. या महापालिका निवडणुकीत किमान १०० नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार भाजपानं केला आहे. ठाण्यासाठी स्वतंत्र धरण बांधणं, नागरिकांना २४ तास पाणी पुरवणं आणि जुन्या, गळणाऱ्या पाइपलाइनसाठी विशेष निधीचं आश्वासन यात असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. ठाणे शहरातल्या १९७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचं आश्वासन यात आहे.

December 22, 2025 8:39 PM

views 94

भाजपा हाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष – मुख्यमंत्री फडणवीस

भाजपा हाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे, हे नगरपालिका निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झालंय, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केलं. त्यांनी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी नागपूर जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी आयोजित वार्ताहर परिषदेत फडनवीस यांनी सांगितलं, की 2017 मध्ये भाजपाच्या नगरसेवकांची संख्या पंधराशे होती, ती या निवडणुकीत ३ हजाराच्या वर गेली आहे. म्हणजे ही संख्या वाढ दुपटी...

December 15, 2025 8:05 PM

views 78

प्रधानमंत्र्यांविषयी काँग्रेस रॅलीत अपशब्द वापरल्याप्रकरणी संसदेत गोंधळ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करुन काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी करत, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेत गदारोळ केला. घोषणाबाजी सतत चालू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसातून दोनदा तर राज्यसभेचं कामकाज एकदा तहकूब झालं.    दिल्लीच्या रामलीला मैदानावर काल झालेल्या काँग्रेसच्या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मुद्दा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेचं कामकाज सुरू झाल्या...

December 15, 2025 7:13 PM

views 109

पुण्यात भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने

आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी महायुती म्हणून लढू, पुण्यात मात्र भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी मैत्रिपूर्ण लढत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिली. पुण्यात त्यांनी वार्ताहरांना संबोधित केलं.   आपल्या सरकारनं केलेलं काम पाहता जनता या निवडणुकीत महायुतीलाच कौल देईल, असा विश्वास फडनवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले आणि काँग्रेस त्यांच्यासोबत गेली तरीही आपल्याला कोणताही फटका बसणार नाही, मुंबईकर महायुतीलाच निवडून देतील, असंही त...

December 14, 2025 8:06 PM

views 216

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नोबिन यांची नियुक्ती

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नोबिन यांची नेमणूक झाली आहे. भाजपाच्या संसदीय मंडळाने ही नियुक्ती केल्याचं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नितीन नोबिन सध्या बिहार मंत्रिमंडळात मंत्री असून ते जे पी नड्डा यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार घेतील. नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी २०२० मधेच संपला होता मात्र २०२४ मधल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांना मुदतवाढ दिली होती. नितीन नोबिन हे मेहनती कार्यकर्ता असून त्यांना संघटनाचा...