खेळ

September 23, 2025 2:46 PM

views 51

आगामी फिडे विश्वचषक स्पर्धेसाठी ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला ‘वाइल्ड कार्ड एंट्री’

फिडे विश्वविजेती महिला बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिला आगामी फिडे विश्वचषक स्पर्धेसाठी वाइल्ड कार्ड एंट्री देण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतातील 21 खेळाडू सहभागी होणार असून भारतीय पथकाचं नेतृत्व जागतिक विजेता डी. गुकेश करणार आहे. येत्या 31 ऑक्टोबर पासून गोव्यात ही स्पर्धा सुरू होणार आहे. 

September 22, 2025 10:27 AM

views 77

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री दुबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. पाकिस्ताननं दिलेलं 172 धावांचं आव्हान भारतानं 18 षटकं आणि 5 चेंडूत साध्य केलं. सलामीवीर अभिषेक शर्मानं सहा चौकार आणि पाच षटकारांसह 39 चेंडूत 74 धावा केल्या तर शुभमन गिलनं 28 चेंडूत 47 धावा ...

September 21, 2025 8:33 PM

views 54

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या १९ वर्षाखालच्या संघांमधे एकदिवसीय सामन्यात भारत विजयी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या, १९ वर्षाखालच्या संघांमधे आज ब्रिस्बेन इथं झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ७ गडी आणि ११७ चेंडू राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात २२५ धावा केल्या. भारतानं ३० षटकं आणि ३ चेंडू अवघ्या तीन गड्यांच्या मोबदल्यात २२७ धावा ...

September 21, 2025 7:58 PM

views 54

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारतीय जोडी उपविजेती

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधन मानावं लागलं. शेनझेन इथं आज अंतिम सामन्यात किम वॉन हो आणि सेओ सेउंग जे या कोरियाच्या जोडीनं त्यांचा २१-१९, २१-१५ असा पराभव केला.  

September 21, 2025 2:38 PM

views 90

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश / आज सामना कोरियाशी चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चीनमधे शेनझेन इथं, आज दुपारी ...

September 21, 2025 2:40 PM

views 128

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. दुबईत भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघानं या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या या आधीच्या सामन्यात सहज विजय नोंदवला आहे. हा सामना जिंकल्यास भारताला थेट अंतिम सामन्यात प्रवेश मिळेल. ...

September 20, 2025 8:16 PM

views 70

बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीची अंतिम फेरीत धडक

चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत त्यांनी मलेशियाच्या जोडीवर २१-१७, २१-१४ अशी सहज मात केली.

September 20, 2025 4:00 PM

views 96

बॅडमिंटन मानांकन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या विप्लव कुवळे आणि विराज कुवळे यांना विजेतेपद

अखिल भारतीय वरिष्ठ गट बॅडमिंटन मानांकन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या विप्लव कुवळे आणि विराज कुवळे यांनी विजेतेपद पटकावलं. त्यांनी चौथी मानांकिंत जोडी सिद्धार्थ इलांगो आणि संतोष गजेंद्रन जोडीचा २१-१६, २१-१० असा पराभव केला.

September 20, 2025 3:43 PM

views 84

आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारा अर्शदीप हा पहिला भारतीय खेळाडू

आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारा अर्शदीप हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अबुधाबी इथं ओमानविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात त्याने टी-ट्वेंटीमधला आपला शंभरावा बळी घेतला.   अर्शदीपचा हा सदुसष्ठावा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामना होता. अफगाणिस्तानच्या राशिद खानने ५३ सामन...

September 20, 2025 2:39 PM

views 80

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल

चीन मास्टर्स बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत, भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना आज मलेशियन जोडी आरोन चिया आणि सोह वूई यिक यांच्याशी होईल. कालच्या उपांत्यपूर्व फेरीत रेन झियांग यू आणि झी हाओनान या चिनी जोडीला पराभूत करून रँकीरेड्डी आणि शेट्टी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.