खेळ

October 3, 2025 1:44 PM

views 68

जागतिक भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक

नॉर्वे इथं सुरु असलेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं. ४८ किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच मध्ये ८४ किलो तर क्लीन अँड जर्क मध्ये ११५ असं एकंदर १९९ किलो वजन उचलत ही कामगिरी केली.

October 2, 2025 6:12 PM

views 99

भारतानं वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला

भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं आज पहिल्याच दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला, आणि दिवसअखेर २ गडी गमावून १२१ धावा केल्या.   अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे फलंद...

October 1, 2025 9:32 AM

views 98

Women’s World Cup : श्रीलंकेचा पराभव करून भारताची विजयी सलामी

आयसीसी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. भारतानं ४७ षटकांमध्ये २६९ धावा केल्या. अमनज्योत कौरनं ५७ धावा करून भारताची बाजू मजबूत केली. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यामुळं भारताची धावसंख्या २७० अशी निश्चित करून श्रीलंकेपुढे विजयासाठी २७१ ध...

September 30, 2025 1:28 PM

views 115

GST Reforms : क्रीडा साहित्यांवर केलेल्या कर सुधारणांविषयी जाणून घ्या…

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात क्रीडा साहित्याबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया…   केंद्रसरकारने वस्तू आणि सेवा करामध्ये केलेल्या सुधारणांमध्ये खेळणी आणि क्रीडा साहित्यावरचा वस्तू आणि सेवा कर १२ टक्क्यांवरुन ५ ट्क्क्यांवर आणला आहे.  या सुधारणेमुळ...

September 30, 2025 9:15 PM

views 775

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं श्रीलंकेपुढे २७० धावांचं आव्हान

आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आज सुरुवात झाली. गुवाहाटी इथं सुरु असलेल्या, या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं  श्रीलंकेपुढं विजयासाठी २७० धावांचं आव्हान ठेवलं आहे. पावसामुळे हा सामना ४७ षटकांचा करण्यात आला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताची सुरु...

September 29, 2025 1:33 PM

views 122

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत नवव्यांदा अजिंक्य

आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत काल अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत आशिया चषकाला नवव्यांदा गवसणी घातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.   नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यामुळे पाकिस्तानचा डाव...

September 28, 2025 7:48 PM

views 92

आयएसएसएफ कनिष्ठ गट जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनुष्का ठोकूर ला सुवर्णपदक

आयएसएसएफ कनिष्ठ गट जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनुष्का ठोकूरने आज मुलींच्या ५० मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. नवी दिल्लीत सुरु असलेल्या या स्पर्धेतलं हे तिचं दुसरं सुवर्णपदक आहे. मुलांच्या स्पर्धेत एड्रियन कर्माकारला रौप्य पदक मिळालं. स्पर्धेत आतापर्यंत ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि...

September 28, 2025 1:41 PM

views 388

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष मिथुन मन्हास

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मिथून मनहास यांची निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र  सिंह यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मिथून हे प्रथम श्रेणी क्रिकेटचे खेळाडू असून आयपीएलसाठी खेळणारे ते जम्मू काश्मीरमधले पहिले खेळाडू आहेत. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी मनहास यांचा...

September 26, 2025 9:28 AM

views 66

आशिया करंडक क्रिकेटचा अंतिम सामना भारत-पाकिस्तान दरम्यान होणार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत काल पाकिस्ताननं बांगलादेशचा १४ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं २० षटकांत ८ बाद १३५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ १२४ धावा करू शकला. अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात परवा २८ तारखेला खेळला जाईल.

September 24, 2025 8:17 PM

views 74

ISSF Junior World Cup: ज्युनियर विश्वचषक स्पर्धा नवी दिल्लीत सुरू

आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या कनिष्ठ गट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून उद्यापासून मुख्य स्पर्धा सुरु होत आहेत. भारतीय चमूत ६९ खेळाडू आहेत. डॉ. करणी सिंग शूटिंग रेंज इथे ही स्पर्धा होत असून ती २ ऑक्टोबर पर्यंत चालेल. भारतासह अमेरिका,इटली,इराण,ब्रिटन कतार,स्पेन अशा मान्यवर देशातले २१ ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.