प्रादेशिक बातम्या

September 13, 2025 3:41 PM

views 43

नवी मुंबई विमानतळाचं उद्घघाटन येत्या तीस सप्टेंबरला होणार

नवी मुंबई विमानतळाचं उद्घघाटन येत्या तीस सप्टेंबरला होणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक-उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी काल ही माहिती दिली. देशातला हा सर्वात मोठा विमानतळ लंडनच्या हीथ्रो विमानतळाच्या बरोबरीचा असेल.  येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. हा विमानतळ जलमार्गालाही ज...

September 13, 2025 2:58 PM

views 44

अनुकंपा तत्त्वावरच्या १५ वर्षांपासून रखडलेल्या नेमणुका लौकरच करणार-मुख्यमंत्री

अनुकंपा तत्त्वावरच्या १५ वर्षांपासून रखडलेल्या नेमणुका लौकरच करणार  असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.   मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ इथं आज आदी कर्मयोगी अभियान आणि जिल्ह्यातील २८९ कोटींच्या प्रकल्पाचं लोकार्पण तसंच लाभ वितरण सोहळा पार पडला. यावेळी त...

September 12, 2025 9:04 PM

views 70

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला १० लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

एन पी सी आय नं व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातल्या युपीआय व्यवहारांची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. येत्या १५ तारखेपासून हा बदल लागू होईल. मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा असल्यामुळे ग्राहकांना व्यवहार विभाजित करून, किंवा धनादेश, बँक ट्रान्सफर यांसारख्या पारंपरिक पद्धती वापराव्या लागत ...

September 12, 2025 9:05 PM

views 65

म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेताना लागणारं कमाल शुल्क ५ टक्क्यावरून ३ टक्के करण्याचा सेबीचा निर्णय

म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेताना लागणारं कमाल शुल्क ५ टक्क्यावरून ३ टक्के करण्याचा निर्णय सेबी अर्थात भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं घेतला आहे. सेबीचे अध्यक्ष तूहीन कांत पांडे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतव...

September 12, 2025 9:02 PM

views 820

राज्यातल्या ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीची आरक्षण सोडत जाहीर

राज्यातल्या ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीची आरक्षण सोडत  आज जाहीर झाली. त्यानुसार परभणीआणि वर्धा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित राहील तर चंद्रपूर, बीड इथं अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी आरक्षित राहील.   अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी पालघर आणि ...

September 12, 2025 6:02 PM

views 19

धरणांमधला गाळ काढण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश

धरणांमधला गाळ काढण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात काल झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी वित्त आणि नियोजन विभागाने केलेल्या सूचना विचारात घेऊन हे प्रस्ताव तयार करावे असंही सांगितलं. पूरनियंत्रणाबरोबरच धरणांची साठवण क्षमता वा...

September 12, 2025 1:42 PM

views 3.4K

देशाचे १५वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली शपथ

देशाचे १५वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पदाची शपथ घेतली. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना शपथ दिली.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, जगदीप धनखड, हमीद अन्सारी, एम वेंकय्या नायडू हे माजी उपर...

September 12, 2025 10:05 AM

views 70

राज्यात एक लाख ९ हजार कोटींचे उद्योजकता गुंतवणूक करार झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. नुकतेच राज्यात एक लाख नऊ हजार कोटींचे उद्योजकता गुंतवणूक करार करण्यात आले असून त्यातून 47 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहेत', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईमध्ये दिली. इंडिया-ऑस्ट्रेलिया ब...

September 11, 2025 7:21 PM

views 25

मराठा आरक्षणासंदर्भात जीआर मागे घ्यावा- ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ

मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरमधली संदिग्धता दूर करावी किंवा हा जीआर मागे घ्यावा अशी मागणी ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकमधे वार्ताहर परिषदेत केली. केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचं प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही, आरक्षणासारख्या संवैधानिक विषयात अशा प्रक्रियेचा अवलंब करणं धोकादायक आहे,...

September 11, 2025 7:00 PM

views 27

नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा, तात्पुरता कार्यभार आचार्य देवव्रत यांच्याकडे

 सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे त्यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोपवला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.