प्रादेशिक बातम्या

June 26, 2024 6:26 PM

views 61

‘दरड प्रवण क्षेत्र मुक्त’ मुंबई करण्याचा राज्य सरकारचा संकल्प – मुख्यमंत्री

'दरड प्रवण क्षेत्र मुक्त' मुंबई करण्याचा राज्य सरकारचा संकल्प असून त्याची सुरुवात झाली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. त्यांनी मुंबईत असल्फा इथल्या हनुमान टेकडी परिसरात भेट देऊन तिथं सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. दरड प्रवण क्षेत्राला सुरक्षा...

June 26, 2024 3:49 PM

views 61

नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू मुळे एका रुग्णाचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू मुळे काल रात्री एका रुग्णाचा मृत्यू झाला. या आजाराने चालू महिन्यात आत्तापर्यंत जिल्ह्यात १० लोक दगावले. काल आणखी ६ जणांना स्वाईन फ्ल्यू ची लागण झाल्याचं आढळून आलं असून यामुळे लागण झालेल्यांची संख्या ३५ इतकी झाली आहे.   पुणे जिल्ह्यात कोथरूड मधल्या एरंडवणे भागात  दोन जणा...

June 26, 2024 7:43 PM

views 62

मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेनुसार मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीच्या पत्रकारपरिषदेत विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. पावसाळी अधिवेशनात राज्यातल्या विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष आवा...

June 26, 2024 1:40 PM

views 58

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या १५०व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशेपन्नासाव्या जयंती दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन इथं  छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण...

June 26, 2024 10:00 AM

views 75

पथ कर वसुलीसाठी उपग्रह यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावेल- नितीन गडकरी

  पथ कर वसुलीसाठी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम प्रभावी, व्यवहार्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावेल असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत या संदर्भातल्या एका आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करताना ते बोलत होते. पथकर भरण्याचं नैत...

June 25, 2024 8:12 PM

views 39

मुंबई सीमा शुल्क विभागाकडून ११ किलो सोनं, १७ लाख रुपयांचं परकीय चलन जप्त

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ आयुक्तालय आणि मुंबई सीमा शुल्क विभागानं १७ ते २४ जून या कालावधीत विविध १८ प्रकरणांमध्ये ६ कोटी ८४ लाख रुपये किमतीचं सुमारे ११ किलो सोनं आणि सुमारे १७ लाख रुपयांचं परकीय चलन जप्त केलं. दुबई, कुवेत, मस्कत, सिंगापूर, अबुधाबी आणि लखनऊ इथं प्रवास करण...

June 25, 2024 8:05 PM

views 59

पुणे पोर्शे प्रकरण : अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून सुटका करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून तत्काळ सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.   बाल न्याय मंडळानं आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला आव्हान देत आरोपीच्या आत्यानं उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. ...

June 25, 2024 7:56 PM

views 54

नीट परीक्षा घोटाळ्यातल्या आणखी एका आरोपीला लातूरमध्ये अटक

नीट परीक्षा घोटाळ्यातल्या आणखी एका आरोपीला लातूर पोलिसांनी अटक केली आहे. संजय जाधव असं या आरोपीचं नाव आहे. त्याला न्यायालयापुढं आज हजर केलं असता न्यायालयानं त्याला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली.   याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकूण चार जणांवर गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत त्यापैकी २ ...

June 25, 2024 7:53 PM

views 89

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७१२ अंकांची वाढ नोंदवत ७८,००० वर बंद

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज पहिल्यांदा ७८ हजारांचा टप्पा ओलांडला. दिवसअखेर सेन्सेक्स ७१२ अंकांची वाढ नोंदवत, ७८ हजार ५४ अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सनं ७८ हजार १६५ अंकांच्या उच्चांकाला स्पर्श केला होता.   निफ्टीनंही आज पहिल्यांदाच २३ हजार ७०० अंकांची पात...

June 25, 2024 7:47 PM

views 72

पंढरपुरात ४ ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन

आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचं यंदा दुसरं वर्ष असून वारकऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्य विभाग पंढरपूर इथं चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी याहीवेळी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट आणि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.