प्रादेशिक बातम्या

July 1, 2024 6:42 PM

views 48

धाराशिव जिल्ह्यातल्या खरीप हंगामाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण

यंदा पावसानं जूनच्या पहिल्या आठवड्यातच हजेरी लावल्यामुळं धाराशिव जिल्ह्यातल्या खरीप हंगामाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी सोयाबीनच्या पिकासाठी सर्वाधिक क्षेत्रावर पेरण्या करण्यात आल्या आहेत. पेरण्या करण्यात आलेल्या अन्य पिकांमध्ये मूग, उडीद, तूर, मका यांसारख्या पिकांचा समावेश आहे. ...

July 1, 2024 6:35 PM

views 50

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १८ किलोपेक्षा जास्त वजनाचं सोनं जप्त

सीमाशुल्क विभागाच्या मुंबई विमानतळ आयुक्तालयाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगवेगळ्या वेळी केलेल्या कारवाईत १८ किलोपेक्षा जास्त वजनाचं सोनं जप्त केलं. २५ जून ते ३० जून या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली. मेणात मिसळलेली पावडर, दागदागिने, सोन्याच्या कांड्या, अशा वेगवेगळ्या स्वरुपात...

July 1, 2024 6:08 PM

views 79

केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा आरोप

केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. आम आदमी पक्षाच्या नेत्यांची तुरुंगातून सुटका करावी अशी मागणीही यावेळी विरोधकांनी केली.

July 1, 2024 5:57 PM

views 91

दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यात कृषी दिन साजरा

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त आज राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. जिल्हा मुख्यालयांमधे तसंच कृषि उत्पन्न बाजार समि...

July 1, 2024 5:53 PM

views 96

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत दंतवैद्यकीय उपचारही समाविष्ट करण्याची घोषणा

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत दंतवैद्यकीय उपचारही समाविष्ट करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधान परिषदेत केली. ही योजना तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी खासगी रुग्णालयांपर्यंत पोहोचून शिष्टमंडळाद्वारे त्यांच्याशी संवाद साधण्यात येईल, असंही त्यांनी...

July 1, 2024 5:50 PM

views 76

राज्यात स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी या अधिवेशनात नवा कायदा मांडण्यात येणार

राज्यात स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी या अधिवेशनात नवा कायदा मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. सरकारने गेल्या अडीच वर्षात विक्रमी १ लाख ८ हजार नोकऱ्या दिल्या आहेत. या सर्व परीक्षा पारदर्शी पद्धतीने पार पडल्या असून लवकरच वर्ग ...

July 1, 2024 3:44 PM

views 86

नीट युजी परीक्षेतल्या गैरप्रकारांसंदर्भात गुजरातमधे एका खासगी शाळेच्या मालकाला अटक

नीट युजी परीक्षेतल्या गैरप्रकारांसंदर्भात सीबीआयने गुजरातमधे एका खासगी शाळेच्या मालकाला अटक केली आहे. ५ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचं केंद्र या शाळेतही होतं. गुजरात पोलिसांनी यापूर्वी ५ जणांना अटक केली असून नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी किमान २७ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची मागणी क...

July 1, 2024 2:55 PM

views 78

यवतमाळ नागपूर महामार्गावर चापरदा गावाजवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू

यवतमाळ नागपूर महामार्गावर चापरदा गावाजवळ झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे ४ च्या सुमारास वेगवान इनोव्हा गाडी आणि ट्रकवर धडकून हा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या इनोव्हा कारमधील प्रवासी पंजाबहून ना...

July 1, 2024 1:45 PM

views 92

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ४ जागांसाठीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या तीन मतदार संघांची मतमोजणी नवीमुंबईत नेरुळ इथं होत असून मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. जळ...

July 1, 2024 5:46 PM

views 84

आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाचा सर्वसमावेशक धोरण

आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाने एक सर्वसमावेशक धोरण ठरवलं असून योग्य प्रक्रिया पूर्ण करून या अधिवेशनात याबाबतचा शासन निर्णय आणला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. आमदार ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.