प्रादेशिक बातम्या

July 3, 2024 7:13 PM

views 50

३०० एकर जमिनीवर होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’

महालक्ष्मी रेसकोर्स भूखंडावरील एकूण २११ एकरपैकी सुमारे ९१ एकर भूखंड रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड कंपनीला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यानं देण्याच्या करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेला आता उर्वरित १२० एकराचा भूखंड म...

July 3, 2024 7:07 PM

views 73

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

July 3, 2024 7:04 PM

views 83

भुशी धरणात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा

पाणीटंचाई असणाऱ्या शहरात विकासकाला पर्यायी पाण्याची सोय करण्याच्या, हे खरेदीदाराला करारपत्रात लिहून देण्याच्या आणि हे ‘रेरा’ला कळवण्याच्या सूचना नगरविकास विभागामार्फत देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. चेतन तुपे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली हो...

July 3, 2024 8:20 PM

views 56

महाराष्ट्रात झिका विषाणू प्रकरण पाहता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची मार्गदर्शक नियमावली जारी

महाराष्ट्रात काही ठिकाणी झिका विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं सर्व राज्यांना मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रात 2 जुलैपर्यंत पुण्यात सहा तर कोल्हापूर आणि संगमनेर इथं प्रत्येकी एक अशा एकूण आठ झिकासंक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. या ...

July 3, 2024 5:25 PM

views 55

पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही- मंत्री दीपक केसरकर

पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली. अशा शाळांचं एकत्रीकरण करून समूहशाळा सुरू करण्याची तरतूद नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे, मात्र, तसं काही करण्याचं सरकारचं धोरण नाही. अशा शाळांचं फक्त सर्वेक्षण सुरू आहे, आद...

July 4, 2024 5:04 PM

views 101

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज नांदेड इथं सुरुवात

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज महाराष्ट्रातल्या नांदेड इथं सुरुवात होत आहे. तर धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उद्या या अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियानात देशातल्या ५०० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानामार्फत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत गरोद...

July 3, 2024 3:42 PM

views 76

शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबईत बैठक

गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामांसाठी विनामूल्य जमिनी मिळवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीनं प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश...

July 3, 2024 3:31 PM

views 77

वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी

राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाईल. तसंच वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. विधी मंडळाच्या आवारात आज ते वार्ताहरांशी बोलत होते.  

July 3, 2024 3:46 PM

views 69

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५ हजार रुपये मदतीची पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. यावर्षी लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी, केंद्र सरकारनं नमूद केलेल्या नव्या दरानं हो...

July 3, 2024 3:58 PM

views 56

निलंबनाचा फेरविचार करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपसभापतींना पत्राद्वारे विनंती

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल निलंबित झालेले विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माफी मागितली आहे.आपल्या निलंबनाचा फेरविचार करावा अशी विनंतीही त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्राद्वारे केली आहे. सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेले...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.