प्रादेशिक बातम्या

July 5, 2024 7:35 PM

views 72

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार हे आज स्पष्ट झालं. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुणीही अर्ज मागे न घेतल्यानं ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आता १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.   भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खो...

July 5, 2024 7:31 PM

views 78

विश्वचषक विजेत्या भारतीय संघातल्या मुंबईकर क्रिकेटपटूंचा विधानभवनात सत्कार

टी २० विश्वचषक विजेत्या भारतीय संघातल्या मुंबईकर क्रिकेटपटूंचा आज विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाला. विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला राज्य सरकारनं ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली.     आजच्या सत्कारमूर्तींमध्ये संघ...

July 5, 2024 7:23 PM

views 56

स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पाचा वापर केला – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

विधानपरिषदेत अर्थसंकल्पावरची चर्चा आज सुरु झाली. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पाचा वापर केला आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. राज्याची आर्थिक स्थिती ,उत्पन्न आणि तूट यांचा ताळमेळ न राखता या अर्थसंकल...

July 5, 2024 3:45 PM

views 57

आषाढीनिमित्त नाशिकमध्ये सायकल वारी

आषाढी एकादशीनिमित्त नाशिकच्या सायकलिस्ट फाऊंडेशननं आयोजित केलेल्या सायकल वारीचा आज प्रारंभ झाला. या सायकल वारीत ३०० सायकलस्वार सहभागी झाले असून त्यात ४० महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या वारीत एका पायानं सायकल चालवणारा  एक दिव्यांग वारकरी देखील सहभागी झाला आहे.

July 5, 2024 3:32 PM

views 49

गडचिरोलीत नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाचा शुभारंभ

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या ३ तालुक्यांमधे नीती आयोगाचे संपूर्णता अभियान राबवण्यात येत आहे. आज त्याचं उद्घाटन जिल्हा परिषदेत झालं याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, कृषी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बचत गटाच्या कार्यकर्त्या आदींना सन्मानित करण्यात...

July 5, 2024 3:25 PM

views 60

विधानसभेत महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक सादर

स्पर्धा परीक्षेत गैरव्यवहार रोखण्यासाठीचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतली जाणारी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) आणि शिक्षक पात्रता चाचणी (TET), यासह शास...

July 5, 2024 1:59 PM

views 44

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू पदी डॉ. प्रशांत बोकारे यांची निवड

राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे निलंबन केल्यानंतर गोंडवाना गडचिरोली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची कुलगुरू पदी निवड केली आहे . बोकारे यांनी कुलगुरू पदाचा पदभार आज स्वीकारला आहे.माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे हे नि...

July 5, 2024 3:16 PM

views 67

महाराष्ट्रालाही विशेष दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार – अर्थमंत्री अजित पवार

  बिहार आणि आंध्रप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. भविष्यात उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले. राज्याच्या राजकोषीय...

July 5, 2024 9:47 AM

views 50

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी ७१ टक्के पेरणी

महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी 71 टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 लाख 10 हजार हेक्टरची वाढ झाल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधानसभेत दिली. आतापर्यंत 101 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या 3 जुलैच्या तुलनेत हे प्रमाण 20 लाख हे...

July 4, 2024 7:53 PM

views 32

दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल – केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही हमी भाव  देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही  केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिल्याचं राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज बातमीदारांना सांगितलं. विखे पाटील यांनी या संदर्भात अमित शाह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.