प्रादेशिक बातम्या

July 27, 2024 7:21 PM

views 19

गोंदिया जिल्ह्यात लोकसभेत जी चूक झाली ती विधानसभेत होऊ देऊ नका – प्रफुल्ल पटेल

लोकसभेत ज्या प्रकारे केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री झाले त्याच प्रकारे आगामी विधानसभेत राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे. ते आज गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. गों...

July 27, 2024 7:14 PM

views 46

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या खोट्या असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या खोट्या असून राजकीय हेतून प्रेरित असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वर्ष २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ही योजना सादर करण्यात आली आहे. वित्त आणि नियोजन विभाग तसंच मंत्रिमंडळाच्य...

July 27, 2024 8:21 PM

views 58

नदीजोड प्रकल्प वेगाने हाती घेण्याच्या सूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

कोकणातलं वाया जाणारं पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळवणे, नदीजोड प्रकल्पाला वेग देणं या महत्वाच्या विषयांसह दुध, कापूस, सोयाबीन, कांदा यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना  न्याय मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निती आयोगाच्या बैठकीत बोलतांना केली. नदीजोड  प्रक...

July 27, 2024 7:17 PM

views 16

रायगड जिल्ह्यातल्या दिघीमध्ये होणार सर्वात मोठा औद्योगिक पार्क

केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या १२ पैकी सर्वात मोठा औद्योगिक पार्क राज्यात रायगड जिल्ह्यातल्या दिघीमध्ये होणार आहे. यासाठी गुंतवणूकदारांकडून सर्वाधिक विचारणा होत असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईत दिली. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत ते मुंबईत वार्ताहरांशी ब...

July 27, 2024 6:21 PM

views 33

८ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल महिलेचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

आठ लाखांचं बक्षीस असलेल्या एका महिला नक्षलीनं आज गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलं. तिच्यावर चकमक आणि हत्या असे दोन गुन्हे दाखल आहेत. रिना नरोटे असं तिचं नाव असून ती भामरागड तालुक्यातल्या बोटनफुंडी इथली रहिवासी आहे. २००६ मध्ये ती नक्षलवाद्यांच्या पेरमिली दलमची सदस्य झाली होती.  आत्मसमर्पण योजना सुरू झाल...

July 27, 2024 7:23 PM

views 42

नवी मुंबईत बेलापूरमध्ये इमारत कोसळून तिघांचा मृत्यू

राज्यात नवी मुंबईच्या बेलापूरमधल्या सेक्टर १९ मधल्या शाहबाज गावातली एक तीन मजली इमारत आज पहाटे कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मदत आणि बचावकार्य पूर्ण झालं असून ५२ जणांची सुखरूप सुटका करण्य...

July 27, 2024 7:03 PM

views 40

संसदेच्या अधिवेशनानंतर जागावाटपासंबंधीची चर्चा पुढे जाईल – शरद पवार

आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा झाली असून संसदेच्या अधिवेशनानंतर जागा वाटपासंबंधीची चर्चा पुढे जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी आज वार्ताहरांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीन...

July 27, 2024 10:54 AM

views 51

मुंबईत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून भारतीय हवामान विभागानं मुंबईसाठी दक्षतेचा पिवळा बावटा दाखवला आहे. मुंबईमध्ये काल तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागानं मुंबईसह पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी देखील पिवळा बावटा तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी नारंगी बावटा जारी केला आहे.

July 27, 2024 9:50 AM

views 50

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचं संकट

  कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागात पाणी घुसू लागलं असून, नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. दूध, भाजीपाला वाहतूक ठप्प झाली आहे. अधून मधून कोसळणाऱ्या सरी वगळता पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचा विळखा‌ अद्याप कायम आहे. यामुळे २६५ मालमत्तांची पडझड झाली असून जिल्ह्यात आज पर्यंत ९८.६२ लाख रुपयांचं नुक...

July 26, 2024 8:28 PM

views 52

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मुंबई दौरा पुढे ढकलण्यात आला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या २९ तारखेचा मुंबई दौरा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलला आहे. महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते येत्या २९ तारखेला वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या ग्रंथाचं प्रकाशन, तसंच महाराष्ट्र विधीमंडळातल्या सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू आणि उ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.