प्रादेशिक बातम्या

July 28, 2024 7:31 PM

views 53

विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाचं उपलजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

कोल्हापुरात विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळानं उपलजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याविषयीचं निवेदन त्यांना सादर केलं. विशाळगडावरच्या कथित अतिक्रमणाचा प्रश्‍न समोपचारानं सुटणं शक्य असतानाही, षडयंत्र करून मुस्लिम वस्तीला लक्ष्य केलं गेलं, इथल्या मशि‍दीव...

July 28, 2024 7:20 PM

views 45

गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे ४० मार्गांवरची वाहतूक ठप्प

    गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे आज जनजीवन विस्कळीत झालं. पुरामुळे गडचिरोली-चार्मोशी आणि आलापल्ली-भामरागड या मार्गांसह जिल्ह्यातल्या चाळीस मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली. धानोरा तालुक्यात गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक १५४ पूर्णांक २ दशांश मिलिमीटर पावसांची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत...

July 28, 2024 6:13 PM

views 25

गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस

गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला.    येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली...

July 28, 2024 3:40 PM

views 48

भंडारा जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाचे २७ दरवाजे उघडले आहेत. लाखनी तालुक्यात अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालं आहे.   नांदेड इथल्या विष्...

July 28, 2024 3:36 PM

views 46

नवी मुंबई आणि परिसरातल्या ग्रामस्थांचा कोपरखैरणे ते वाशी लॉंग मार्च

नवी मुंबईतल्या शिळफाटा इथल्या मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याप्रकरणी आज नागरिकांनी नवी मुंबईत मोर्चा काढला. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.   दरम्यान, यातल्या दोषींवर आरोपपत्र दाखल कर...

July 28, 2024 3:46 PM

views 43

नवी मुंबईतल्या हिट अँड रन प्रकरणी दोन आरोपींना अटक

नवी मुंबईच्या वाशी सेक्टर ९ मधल्या हिट अँड रन प्रकरणात दोन आरोपींना काल रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी एका कारनं दिलेल्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं दोन्ही आरोपींना अटक केली.

July 28, 2024 1:30 PM

views 50

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

महाराष्ट्रातल्या एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. शोमा सेन, रोना विल्सन, सुधीर ढवळे, महेश राऊत आणि सुरेंद्र गडलिंग यांनी जामिनीसाठी याचिका दाखल केली होती. या सर्वांना २०१८ साली अटक करण्यात आली होती.

July 28, 2024 1:28 PM

views 37

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. सध्याचे झारखंडचे राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. तर, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरी भाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. तेलंगणात, त्...

July 28, 2024 2:44 PM

views 52

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी आज विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात झाला. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. भाजपाच्या पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, शिवसेनेच्या भावना गवळ...

July 27, 2024 7:26 PM

views 39

यंदा आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या खजिन्यात ८ कोटी ३४ लाख रुपये जमा

यंदा आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या खजिन्यात ८ कोटी ३४ लाख रुपये जमा झाल्याची माहिती कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात झालेला समाधानकारक पाऊस, त्यामुळे उरकलेली शेतीची कामं यामुळे यंदा मोठ्या संख्येनं आषाढीसाठी आले होते. त्यामुळे देवाच्या तिजोरीत गेल्या वर्षीपेक्षा दोन कोटी ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.