प्रादेशिक बातम्या

September 26, 2024 7:02 PM

views 33

रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करण्यासाठी ४०० कोटी रुपये मंजूर

रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं ४०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या वाटद, राजापूर, मंडणगड इथं एमआयडीसीसह आणखीही  काही प्रकल्प उभारले जाणार आह...

September 26, 2024 7:00 PM

views 31

राजकोट इथं शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणार – मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण-राजकोट इथं शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली. ओरोस इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते.    राजकोट इथं शिव छत्रपतींचा पूर्णाकृती ब्रॉन्झचा पुतळा उभारणार येणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. पुतळ्याच्...

September 26, 2024 6:55 PM

views 21

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ‘महाविजय संवाद’ दौरा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ‘महाविजय संवाद’ या राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा आज केली. शिवसेनेच्या युवा सेना, महिला आघाडी आणि शिवसेना सोशल मीडिया या तीन विभागांकडून उद्यापासून राज्यभरात हे अभियान राबवलं जाणार आहे. यात प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आढावा घेऊन पक्ष संघटना मजबूत केली जाई...

September 26, 2024 6:49 PM

views 32

MPSCकडून राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करुन दिली जाईल, असं आयोगानं कळवलं आहे.  ही यादी विविध न्यायालयांमधे दाखल असलेल...

September 26, 2024 7:27 PM

views 71

राज्यातल्या अनेक धरणांच्या पातपातळीत वाढ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यावर पोहोचला असून धरणाच्या १८ दरवाजांमधून सध्या ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर तर बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. लातूर जिल्ह्यातल...

September 26, 2024 3:47 PM

views 38

पालघर आणि नाशिकमध्ये उद्या सकाळीपर्यंत ‘रेड अलर्ट’

हवामान विभागानं उद्या सकाळी साडे ८ वाजेपर्यंत पालघर आणि नाशिकमध्ये रेड अलर्ट दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे, रायगड तसंच पुण्यात ऑरेंज अलर्ट आहे. राज्याच्या इतर भागातही आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

September 26, 2024 3:36 PM

views 15

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . सुभाष चौधरी यांचं निधन

नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . सुभाष चौधरी यांचं एका खासगी रुग्णालयात आज निधन झालं. डॉ. चौधरी यांना यकृताशी संबंधित आजार होता.   डॉक्टर चौधरी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ...

September 26, 2024 3:10 PM

views 38

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू – चंद्रशेखर बावनकुळे

संघटन शक्ती मजबूत करण्याची आणि डबल इंजिन सरकारची कामगिरी सामान्य माणसांपर्यंत पोहचवण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात दिली आहे. या मूलमंत्राचे पालन करुन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ...

September 26, 2024 3:18 PM

views 36

महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यासह राज्यभरात पावसाचं थैमान

मुंबईसह अनेक ठिकाणी काल मुसळधार पावसाने थैमान घातलं. मुंबईतले अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पाऊस आणि वादळामुळे विमानतळावरची १६ उड्डाणं वळवण्यात आली. तसंच, अनेक रेल्वेगाड्याही थांबवाव्या लागल्या. मुसळधार पावसामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर झाली ...

September 26, 2024 3:19 PM

views 27

खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानी प्रकरणी १५ दिवसांची कोठडी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने आज १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. मीरा भाईंदर शहरातल्या शौचालय कंत्राटावर केलेल्या विधानामुळे मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. मीरा भाईंदर पालिका क्षेत्रातल...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.