प्रादेशिक बातम्या

October 14, 2024 7:17 PM

views 37

विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी म्हणूनच निवडणूक लढवणार – नाना पटोले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीबद्दल या बैठकीत चर्चा झाली असून महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर सांगितलं.

October 14, 2024 7:10 PM

views 29

प्रत्येक गिरणी कामगाराला घर देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

येत्या काळात प्रत्येक गिरणी कामगाराला घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या या घरांसाठी अर्ज केलेल्या १ लाख ६५ हजारांपैकी १ लाख १८ हजार अर्ज वैध ठरले आहेत. त्यांना लवकरच घरं दिली जातील, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज दिली. गिरणी कामगारांसाठीच्या घरांचं बांधकाम करणाऱ्या विकासकांना प...

October 14, 2024 7:06 PM

views 46

मविआचं सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर आंदोलन

महाविकास आघाडीच्यावतीनं सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ७० टक्क्यांहून अधिक पदं रिक्त असून नवीन इमारतीच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.  याबाबत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तसंच अधिष्ठाता यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी महावि...

October 14, 2024 7:02 PM

views 31

नक्षल दाम्पत्याचं केंद्रीय राखीव दल आणि गडचिरोली जिल्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण

अनेक गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या नक्षल दाम्पत्यानं आज केंद्रीय राखीव दल आणि गडचिरोली जिल्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. वरुण राजा मुचाकी उर्फ उंगा उर्फ मनिराम उर्फ रेंगू याच्यावर १५ गुन्हे दाखल असून सरकारनं त्याच्यासाठी ८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. तो छत्तीसगडचा असून तो सध्या भामरागड...

October 14, 2024 6:59 PM

views 35

नांदेडमध्ये स्वराज्य पक्षातर्फे शेतकरी आसूड मोर्चा

नांदेडमध्ये आज स्वराज्य पक्षातर्फे शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात आला. सोयाबीनला  प्रति क्विंटल ८ हजार ५०० रुपये दर मिळावा, कापसाला ११ हजार प्रति क्विंटल, ऊसाला प्रति टन ३ हजार ५०० रुपये दर मिळावा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

October 14, 2024 6:54 PM

views 50

सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी तिसऱ्या आरोपीला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली. न्यायालयानं त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.  प्रवीणचा भाऊ शुभम फरार आहे. सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतल्याची पोस्ट शुब्बू ल...

October 14, 2024 7:22 PM

views 68

राष्ट्रीय जलपुरस्कारांमधे महाराष्ट्राला विविध विभागात मिळून ५ पुरस्कार

पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमधल्या उत्कृष्ट महानगरपालिका श्रेणीत पुणे महानगर पालिकेला तिसरा क्रमांक जाहीर झाला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी नवी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २२ ऑक्टोबरला नवी दिल्लीत या पुरस्कारांचं वितरण करतील. उत्कृष्ट राज्यांच...

October 14, 2024 7:58 PM

views 29

इथेनॉल जैवइंधनाचे देशभरात ४०० पंप सुरु – मंत्री नितीन गडकरी

इथेनॉल जैवइंधनाचे देशभरात ४०० पंप सुरु झाले असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने नवी दिल्ली इथं आयोजित जैव इंधन शिखर परिषदेत आज ते बोलत होते.  इथेनॉल आणि गॅस या दोन्ही इंधनावर चालू शकतील अशी वाहनं लौकरच बाजारात आणण्याचा ...

October 14, 2024 6:20 PM

views 180

तलाठी आणि कोतवाल पदाच्या नावात राज्य सरकारकडून बदल

राज्य सरकारनं तलाठी पदाचं नाव बदलून ग्राम महसूल अधिकारी केलं आहे. कोतवाल पदाचं नाव बदलून महसूल सेवक करण्याचा शासन आदेशही सरकारनं आज जारी केला. या नाव बदलामुळं तलाठी किंवा कोतवालांचं काम किंवा वेतनश्रेणीत काहीही बदल होणार नाही. तलाठी आणि कोतवालांच्या संघटनेनं केलेल्या मागणीनुसार सरकारनं ही नावं बदलली...

October 14, 2024 6:31 PM

views 34

राज्य सरकारनं शिक्षकांवरचा भार कमी केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचं स्थान अतिशय महत्त्वाचं असून आपल्या सरकारनं शिक्षकांवरचा भार कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या विजेत्या शाळांना त्यांच्या हस्ते आज पुरस्कार देऊन गौरवण्यात आल...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.