प्रादेशिक बातम्या

October 15, 2024 5:01 PM

views 41

देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी विशेष गाडीला रेल्वेमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

देवळाली ते दानापूर या शेतकरी समृद्धी विशेष गाडीला आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. या गाडीमुळे शेतकऱ्यांना केवळ प्रतिकिलो चार रुपये या माफक दरात मालवाहतूक करता येईल असं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातल्या दहा स्थानंकांचा अमृत स्थानक ...

October 15, 2024 11:51 AM

views 39

आपण निवडून आलो तरी आपला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला कायम विरोध राहिल – प्रकाश आंबेडकर

आपण निवडून आलो तरी आपला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला कायम विरोध राहिल, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर त्यांनी यावेळी टीका केली. अदिवासी आणि ओ बी सी समाजाची एकत्रित मोट आम्ही ...

October 15, 2024 11:21 AM

views 27

उदगीर ते देगलूर आणि आदमपूर फाटा ते सगरोळी फाटा मार्गाच्या ८०९ कोटी ७७ लाख रुपयांच्या कामांना केंद्र सरकारची मंजुरी

राष्ट्रीय महामार्ग-६३ वर उदगीर ते देगलूर आणि आदमपूर फाटा ते सगरोळी फाटा मार्गाच्या, ८०९ कोटी ७७ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून ही माहिती दिली. या मार्गामुळे उदगीर, मुक्रमाबाद आणि देगलूर शहरातल्या औद्योगिक कृ...

October 15, 2024 11:16 AM

views 55

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी ८० हजार कोटीचा प्रकल्प राबवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी ८० हजार कोटीचा प्रकल्प राबवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या कुंभारपिंपळगाव इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. मराठवाड्यामध्ये जे आवश्यक आहे, त्या बाबी करून नदीजोड प्रकल्पच्या माध्यमातून ...

October 15, 2024 8:53 AM

views 34

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे १९ महत्त्वाचे निर्णय

मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पथकरातून सवलत दिल्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाला द्याव्या लागणाऱ्या भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्...

October 15, 2024 8:33 AM

views 48

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित भाडेवाढ मागे घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय

दिवाळीत प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडेवाढ होणार होती. यासंदर्भातलं पत्रक शुक्रवारी महामंडळानं प्रसिद्ध केलं होतं. हे पत्रक मागे घेत असल्याचं एसटी महामंडळानं काल जाहीर केलं.

October 14, 2024 8:17 PM

views 50

केरळमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी

केरळमधल्या कन्नुर जिल्ह्यात ऑरेंज तर इडुकी, मलप्पुरम, कोझीकोड आणि वायनाड जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसांत पावासाचा जोर आणखी वाढेल, असंही हवामान विभागाने कळवलं आहे.

October 14, 2024 8:41 PM

views 55

प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

प्रसिद्ध अभिनेता अतुल परचुरे यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झालेल्या अतुल परचुरेंनी बालरंगभूमीपासूनच अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. रंगभूमीबरोबरच छोट्या आणि मोठ्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मराठी - हिंदी मिळून त्यांनी ४० पेक्षा जास्त...

October 14, 2024 8:10 PM

views 33

‘भगवान गौतम बुद्धांचा विचार तळागाळात पोहोचवून परिवर्तन करण्याची ताकद भिक्खु संघात आहे’

भगवान गौतम बुद्धांचा विचार तळागाळात पोहोचवून परिवर्तन करण्याची ताकद भिक्खु संघात आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजु यांनी केलं. मुंबईत समता परिषदेने भिक्खु संघासाठी आयोजित केलेल्या भोजनदान, चिवरदान कार्यक्रमात रिजिजु सहभागी झाले होते, त्यांनी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. गौतम बुद्ध,...

October 14, 2024 8:11 PM

views 29

महाराष्ट्र भाजपाच्या कोअर समितीची बैठक

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आज महाराष्ट्र भाजपाच्या कोअर समितीची बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा उपस्थित होते. विधानसभेच्या १५० ते १६० जागा लढवण्यावर चर्चा झाली. तसंच राज्यातील मित्रपक्षांबरोबर जागा वाटपाबाबत काय तोडगा काढता येतील, यावर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.