प्रादेशिक बातम्या

November 29, 2025 6:56 PM

views 126

निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग पोलिसांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यासह ३-४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजपाचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी केलेल्या घुसखोरी प्रकरणी केनवडेकर यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला. यामागे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा हात असल्याचा आरोप राणे यांनी केला ...

November 29, 2025 6:27 PM

views 152

भारतातल्या क्रिएटर्ससाठी ५ नव्या भारतीय भाषांचा समावेश

मुंबईत झालेल्या ‘हाऊस ऑफ इंस्टाग्राम’ कार्यक्रमात मेटा प्लॅटफॉर्म्स कंपनीनं भारतातल्या क्रिएटर्ससाठी ५ नव्या भारतीय भाषांचा समावेश केला आहे.  यामुळे इंस्टाग्राम, फेसबुकवरील क्रिएटर्स लवकरच त्यांच्या रील्सचे बंगाली, मराठी, तेलुगु, कन्नड आणि तमिळ या भाषांमधे भाषांतर करू शकतील.  यासाठी एआय-आधारित ऑटोमॅ...

November 29, 2025 6:06 PM

views 79

मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी – वर्षा गायकवाड

मुंबईतल्या वायू प्रदूषणाच्या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली  आहे. त्या मुंबईत हवेच्या गुणवत्ता विषयावर काँग्रेसकडून आयोजित बैठकीत आज बोलत होत्या. दूषित हवेमुळे दरवर्षी मुंबईतले ५ हजार शंभर लोक आपले प्राण गमावतात असं गायकवाड या...

November 29, 2025 5:02 PM

views 46

दरेकसा दलमच्या 11 जहाल नक्षलवाद्यांची गोंदिया पोलिसांकडे शरणागती

नक्षल संघटनेतला वरिष्ठ नेता अनंत उर्फ विनोद साय्यणा याच्यासह ११ नक्षली अतिरेक्यांनी काल गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.   यामुळं नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. हे सर्वजण दरेकसा दलम या नक्षल गटाचे सदस्य होते असं गडचिरोली रेंज चे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल यांनी सांगितलं.  यावेळी पोलिसांन...

November 29, 2025 5:00 PM

views 382

ठाण्यात सेक्स रॅकेट उध्वस्त, पोलिसांची कारवाई

ठाणे पोलीसांनी केलेल्या कारवाईत एक सेक्स रॅकेट उध्वस्त केले. या प्रकरणी थायलंडची नागरिक असलेल्या एका महिलेला अटक केली आहे, तर थायलंडच्याच नागरिक असलेल्या दोन महिलांची सुटका केली गेली अशी माहिती कासारवडवली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली.    अटक केलेली महिला वेश्याव्यवसायासाठी परदेशी नागरिकांच...

November 29, 2025 4:51 PM

views 41

नव्या कामगार कायद्यांवर अरविंद सावंत यांची टीका

केंद्र सरकारच्या चार नव्या कामगार कायद्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. हे कायदे कामगारांचे अधिकार नष्ट करून अनिश्चितता तयार करतील, असे सावंत म्हणाले. भारतीय कामगार सेना या कायद्यांच्या अंमलबजावणीला विरोध करेल. या कायद्यांना न्यायालायात आव्हान दिले...

November 29, 2025 6:53 PM

views 116

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात प्रचाराला जोर

राज्यातल्या २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार संपायला २ दिवस शिल्लक आहे. त्यामुळं राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रापूर इथं प्रचारसभा घेतली....

November 29, 2025 3:01 PM

views 74

पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडच्या नगराध्यक्षाला अटक

पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडच्या नगराध्यक्षाला पोलिसांनी आज अटक केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे १११ कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न त्याने केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचं बनावट पत्र बँकेत सादर करुन हे पैसे घेण्याचा प्रयत्न त्यानं केला. पण बँकेतल्या कर्मचाऱ्यांना शंका आल्यानं त्यांनी पडताळणी केली...

November 29, 2025 2:53 PM

views 40

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४९व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा संपन्न

देशाला बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम असणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉ. अजय कुमार यांनी आज पुण्यात केलं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४९ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते.  यावेळी ३२९ स्नातकांना...

November 28, 2025 3:10 PM

views 132

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराला वेग

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून विविध पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना, वाशीम, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विविध प्रचारसभांना संबोधित करत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे, अहिल्यानगर आणि रा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.