प्रादेशिक बातम्या

October 17, 2024 7:54 PM

views 82

दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत महत्वाची अपडेट

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांचं अधिकृत वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही असं मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकांबद्दल समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झा...

October 17, 2024 6:51 PM

views 54

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार आणि राजकीय पक्षांना गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी करावी लागणार

महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी करावी लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध...

October 17, 2024 6:57 PM

views 39

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात झाली आहे.    रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास नाके उभारण्यात आले असून सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अध...

October 17, 2024 3:57 PM

views 67

वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात ३० उमेदवारांची नावं आहेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागांवर हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.        

October 17, 2024 3:02 PM

views 48

यूजीसी नेट २०२४ परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

यंदा जून महिन्यात एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने घेतलेल्या यूजीसी नेट २०२४ परीक्षेचा निकाल उद्या १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. राष्ट्रीय चाचणी संस्थेने समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे.

October 17, 2024 7:14 PM

views 48

महाविकास आघाडीचं जागावाटप आज पूर्ण होण्याची शक्यता

महाविकास आघाडीचं जागावाटप आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत २१६ जागांवर सहमती झाली आहे, उरलेल्या जागांवर आजच्या बैठकीत सहमती होईल, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पत्रकारपरिषदेत  सांगितलं. काँग्रेसच्या ८४ जागांवरच्या उमेदवारांची छाननी झाली आहे. रविवारी ...

October 17, 2024 9:23 AM

views 46

सिंधुदुर्गात चित्रकथी रामायण महोत्सव 2024 चे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या सहयोगानं आणि दायती लोककला संवर्धन अकादमी पिंगुळी यांच्या आयोजनातून आज आणि उद्या ठाकरवाडी म्युझियममध्ये चित्रकथी रामायण महोत्सव 2024 चं आयोजन करण्यात आल आहे.चित्रकथी या कला प्रकाराला घेऊन आयोजित होणारा महोत्सव हा इतिहासातला पहिलाच महोत्सव असून...

October 17, 2024 9:16 AM

views 19

तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दार कामाचा शुभारंभ

तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ सातारा गादीच्या महाराणी दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते काल करण्यात आला.देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेवून मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचं नियोजन करण्यात आलं आहे. समितीच्या निधीमध...

October 17, 2024 8:48 AM

views 28

पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर लक्ष ठेवणार असल्याचा निवडणूक आयोगाचा इशारा

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असणार आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारी C-VIGIL ऍपवर नोंदवू शकतात, अशी माहिती अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदे...

October 16, 2024 8:50 PM

views 34

विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपी अटक

विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. १४ ऑक्टोबर रोजी आरोपीने एका बनावट एक्स खात्यावरून चार विमानांमध्ये स्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. यात तीन आंतरराष्ट्रीय विमानं होती. धमकीमुळे दोन विमानांना उशीर झाला तर एक विमान रद्द करावं लागलं ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.