प्रादेशिक बातम्या

October 18, 2024 9:19 AM

views 43

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दोन दिवसांची मुदत

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. उद्या १९ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी असून, निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. सर्व मतदारांनी आपलं नाव मतदार याद...

October 18, 2024 9:46 AM

views 34

हरित ऊर्जा हा भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या धोरणाचा महत्त्वाचा घटक – राज्यपाल

‘हरित ऊर्जा’ हा भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या धोरणाचा महत्त्वाचा घटक असल्याचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. जागतिक व्यापार केंद्राच्या मुंबई विभागानं आयोजित केलेल्या, 'शाश्वत विकासासाठी हरित आणि नवीकरणीय ऊर्जा' या विषयावरच्या जागतिक व्यापार प्रदर्शनात बोलत होते. महाराष्ट्र राज्य, सौरऊर...

October 18, 2024 8:53 AM

views 59

भाजपा आमदार डॉ. राहुल आहेर यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड- देवळा विधानसभा मतदार संघातले भाजपाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा काल पत्रकार परिषदेत केली. या मतदारसंघात उमेदवारीसाठी आपले चुलतबंधू आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नावाची शिफारस डॉ आहेर यांनी पक्षाकडे केली आहे. भाजप...

October 18, 2024 8:50 AM

views 40

रेल्वेचं आगाऊ आरक्षण १२० ऐवजी ६० दिवसाआधी करता येणार

रेल्वेनं प्रवासाच्या आरक्षणाची आगाऊ कालमर्यादा निम्म्यावर आणली आहे. आता प्रवाशांना प्रवासाच्या ६० दिवसांआधी आरक्षण करता येणार आहे. येत्या एक नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं रेल्वे मंडळानं पत्रकाद्वारे कळवलं आहे. सध्या प्रवासाच्या १२० दिवस म्हणजे सुमारे चार महिने आधीच आरक्षण करता य...

October 18, 2024 8:46 AM

views 67

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर तर मुलींमधून मुंबईच्या संघाला विजेतेपद

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर संघानं तर मुलींच्या गटात मुंबई संघानं विजेतेपद पटकावलं आहे. यजमान लातूर विभागाच्या दोन्ही संघास उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. जिल्हा क्रीडा ...

October 18, 2024 8:43 AM

views 70

नाशिक ते दिल्ली दरम्यानची ‘कांदा एक्स्प्रेस’ रेल्वे गाडी रवाना

दिवाळीपूर्वी बाजारातली कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी नाशिक ते दिल्ली दरम्यानची कांदा एक्स्प्रेस रेल्वेगाडी काल रवाना झाली. ही विशेष गाडी 1600 मेट्रिक टन कांदा घेऊन येत्या 20 ऑक्टोबरला नवी दिल्ली इथं पोहोचणार असून त्यानंतर हा कांदा राजधानी दिल्लीतल्या घाऊक बाजारपेठांमध्ये वितरित केला जाईल, असं ग्र...

October 17, 2024 7:49 PM

views 81

मुंबईत १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाणीकपात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणातून पाणी वाहून नेणाऱ्या  जलवाहिनीच्या यंत्रणेत  बिघाड झाल्यामुळे आज १७ आणि उद्या १८ ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व ठिकाणी  ५ ते १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.  जलवाहिनीच्या यंत्रणेचं  दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु असून, या काळात नाग...

October 17, 2024 7:26 PM

views 42

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या ६०० पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या ६०० पदाधिकाऱ्यांनी नुकताच सामूहिक राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये संधी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले असून त्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल...

October 17, 2024 7:23 PM

views 34

‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर महायुतीने २०० कोटींची उधळपट्टी केल्याचा काँग्रेसचा आरोप

‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर महायुती सरकारने २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जनतेच्या कष्टाचा पैसा हे सरकार जाहिरातींवर खर्च करत असल्याचं प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज मुंबईत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

October 17, 2024 7:13 PM

views 44

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात भूकंपाचे दोन सौम्य धक्के

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात दांडेगाव आणि परिसरामध्ये आज दुपारी भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले, मात्र त्याची नोंद अद्याप झाली नाही, अशी माहिती जिल्हा अपत्ती व्यवस्थापन कार्यालयातून देण्यात आली. या परिसरात  गेल्या चार वर्षांपासून असे धक्के बसतात. आज दुपारी २ वाजून १० मिनिटांनी आणि नंतर दो...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.