प्रादेशिक बातम्या

November 15, 2024 7:05 PM

views 49

काँग्रेसची NRC, मॉब लिंचिंग, कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर भूमिका नाही, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

गेल्या पाच वर्षामध्ये NRC, मॉब लिंचिंग, कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर काँग्रेसनं काहीही भूमिका घेतली नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. या सगळ्या प्रश्नांवर आपल्या पक्षाने भूमिका घेतली, असं ते अमरावतीत नांदगावमध्ये झालेल्या प्रचारसभेत म्हणाले.

November 15, 2024 6:54 PM

views 64

अकोले तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होईल, अजित पवारांचं आश्वासन

अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यातल्या नागरिकांच्या सिंचनाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय निळवंडे प्रकल्पातून झाली आहे. आगामी काळात अकोले तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होईल. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक लवकरच उभारण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले...

November 15, 2024 6:47 PM

views 34

राज्यात सत्तेत बदल करण्याशिवाय पर्याय नाही – शरद पवार

राज्यात ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांचा अनुभव चांगला नसल्यानं सत्तेत बदल करण्याशिवाय पर्याय नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते. सत्ता बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा, असं आवाहन त्यांनी केलं.

November 15, 2024 6:41 PM

views 104

सोयाबीन खरेदीसाठी भावांतर योजना लागू करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

सोयाबीन खरेदी करताना किमान आधारभूत किंमतीतली तफावत दूर करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलं. नांदेडमधल्या प्रचारसभेत ते बोलत होते. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी महायुतीच्या आश्वासनांच...

November 15, 2024 6:41 PM

views 41

जातनिहाय जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं काँग्रेसचं भाजपाला आव्हान

जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बाेलत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण  संपवणार असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप त्य...

November 15, 2024 6:41 PM

views 46

महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्याचं गृहमंत्री अमित शाह यांचं आवाहन

राज्यातलं महायुतीचं सरकार गरजू जनतेला समर्पित आहे, ते पुन्हा सत्तेत आणा, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते आज हिंगोली इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते. जनतेला घरं, स्वच्छतागृहं, पिण्याचं पाणी, धान्य, मोफत गॅस सिलेंडर, मोफत औषधोपचार अशा विविध व्यवस्था हे सरकार देत आहे, असं ते म...

November 15, 2024 3:24 PM

views 45

काँग्रेसनंच राज्यघटनेची मोडतोड केली – मंत्री नितीन गडकरी

भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात आष्टी इथं प्रचारसभा घेतली. भाजपा राज्यघटना बदलणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेस करीत आहे, पण खरं तर काँग्रेसनंच अनेकदा घटनेची मोडतोड केली, असं ते यावेळी म्हणाले. लोकांना पटवून देता येत नाही म्हणून संभ्रमित करण्याचा प्रयत्न ...

November 15, 2024 4:45 PM

views 41

मतदानाच्या दिवशी मुंबईत विशेष लोकल सेवा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे मतदारांच्या सोयीसाठी विशेष उपनगरी गाड्या चालवल्या जाणार आहेत. या विशेष गाड्या १९ ते २१ या कालावधीसाठी मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसएमटी ते पनवेल असा प्रवास करतील. मतदानाच्या दिवशी मु...

November 15, 2024 2:29 PM

views 43

महाराष्ट्राची लूट होऊ न देता त्याच्या रक्षणासाठी लढणार असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन

विधानसभेची यंदाची राज्यावर प्रेम करणारे आणि राज्याची लूट करणारे यांच्यातली लढाई आहे. महाराष्ट्राची लूट होऊ न देता त्याच्या रक्षणासाठी लढणार असल्याचं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं.   औरंगाबादचं नामांतर केल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा च...

November 15, 2024 1:50 PM

views 41

७ हजार रुपये क्विंटल दराने सोयाबीन खरेदीची मल्लिकार्जून खर्गे यांची घोषणा

महाविकास आघाडी सरकार ७ हजार रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करेल, असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलं आहे. पुण्यात काल वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. कांद्याच्या दरासंदर्भात एक समिती स्थापन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.