प्रादेशिक बातम्या

December 8, 2024 3:23 PM

views 73

निवडणूक आयुक्‍त निवडण्‍याच्‍या प्रक्रियेत फेरफार – पृथ्वीराज चव्हाण

राज्यघटनेतल्या तरतुदींनुसार निवडणूक आयोग स्‍वायत्त संस्‍था आहे, मात्र निवडणूक आयुक्‍त निवडण्‍याच्‍या प्रक्रियेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेरफार केले. अप्रत्‍यक्षपणे सरकारच आयुक्तांची नेमणूक करीत असून त्यामुळे आयोग सरकारला अपेक्षितच काम करतो, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी के...

December 8, 2024 7:04 PM

views 87

‘मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ग्रामस्थांच्या निर्णयावर आक्षेप घेण्याचं कारण नाही’

मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार उत्तम जानकर हे देखील उपस्थित होते. मारकडवाडी ग्रामस्थांनी स्वतःच्या मतांची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यास त्‍...

December 8, 2024 7:02 PM

views 42

विरोधकांचा शपथविधीवरचा बहिष्कार मागे, आतापर्यंत २८० सदस्यांचा शपथविधी

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी १०६ नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. काल १७३ नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली होती. महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या वापराला निषेध म्हणून काल ...

December 8, 2024 7:26 PM

views 35

राज्यात पुन्हा गारठा वाढणार

गेल्या आठवड्यात तामिळनाडूच्या समुद्रात तयार झालेल्या फेंजल चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर आता पुन्हा राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांत राज्यात काही भागात हलक्या सरींची शक्यता असली, तरी उर्वरित भागात हवामान कोरडं व्हायला सुरुवात झाल्यानं आता राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज ह...

December 8, 2024 11:40 AM

views 24

लातूर महानगरपालिकेची महिलांसाठी मोफत शहर बस सेवा चालूच राहणार – अमित देशमुख

लातूर महानगरपालिकेची महिलांसाठी मोफत शहर बस सेवा पुढे चालूच राहणार असल्याचं, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. महापालिका प्रशासनाने महिलांना स्मार्ट कार्ड देण्यासाठी प्रत्येक प्रभागात केंद्र सुरू करावीत, अशा सूचना देशमुख यांनी आहे.

December 8, 2024 11:14 AM

views 57

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने आमचे शौचालय आमचा सन्मान या स्पर्धेचं आयोजन

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने कालपासून आमचे शौचालय आमचा सन्मान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयात पाण्याच्या नळाची सुयोग्य जोडणी, सुरळीत आणि सुरक्षित वीज पुरवठा, सुस्थितीत असलेले छत तसंच दरवाजे, स्वच्छता, रंगरंगोटी, या निकषांनुसार उत्कृष्ट शौचालयाची निवड ...

December 8, 2024 11:08 AM

views 55

परभणी येथे विभागस्तरीय युवा महोत्सवाला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

परभणी येथे विभागस्तरीय युवा महोत्सवाला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, वक्तृत्व, कौशल्य विकास, कविता वाचन, कथालेखन, तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या नव संकल्पना इत्यादी विविध प्रकारात स्...

December 8, 2024 11:03 AM

views 253

अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ

अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. आज सकाळी दहा वाजता वर्णी देण्याचा कार्यक्रम होणार आहे. १५ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र महोत्सवामध्ये कीर्तन, गायन, भजन, वाघ्या- मुरळी आदी कार्यक्रम होणार असल्याची माहिती, योगेश्वरी देवस्थानच्या विश्...

December 8, 2024 11:00 AM

views 34

अनंत भालेराव प्रतिष्ठानचा ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथं होणार

अनंत भालेराव प्रतिष्ठानचा 'अनंत भालेराव स्मृती पुरस्कार' प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी साडे पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात, निवृत्त पोलिस अधिकारी डॉ.मीरा चढ्ढा बोरवणकर यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. यावे...

December 8, 2024 10:06 AM

views 61

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शपथग्रहण प्रक्रिया सुरू

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्वप्रथम चैनसुख संचेती, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे आणि आशिष जयस्वाल या नवनिर्वाचित आमदारांना, तालिका अध्यक्ष म्हणून सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्र...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.