प्रादेशिक बातम्या

January 1, 2025 8:01 PM

views 60

वायू प्रदूषणाचं प्रमाण नियंत्रणात नाही तोपर्यंत बांधकाम प्रकल्‍पांवरचे निर्बंध कायम

मुंबई शहरातलं वायू प्रदूषणाचं प्रमाण  पूर्ण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत  ई विभागातल्या बांधकाम प्रकल्‍पांवरचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार  असल्याचं महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. भायखळा परिसरात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्‍पांची  पाहणी केल्यानंतर महानगरपालि...

January 1, 2025 7:56 PM

views 24

‘भीमा कोरेगाव इथल्या विजय स्तंभ स्मारकाभोवती २०० एकर जागा आणि २०० कोटी रुपयांचा निधी शौर्य स्तंभ स्मारकासाठी द्यावी’

भीमा कोरेगाव इथल्या विजय स्तंभ स्मारकाभोवती २०० जागा आणि २०० कोटी रुपयांचा निधी शौर्य स्तंभ स्मारकासाठी द्यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. विजय स्तंभाला अभिवादन केल्यानंतर ते ...

January 1, 2025 6:58 PM

views 62

राज्यात विविध उपक्रमांनी नववर्षाचं स्वागत

राज्यात विविध उपक्रमांनी नववर्षाचं स्वागत झालं. विविध देवस्थानांवर नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिवसेनेच्या वतीनं ठाण्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेत रक्तदान केलं. धुळे जिल्ह्यातही युवक बिरादरी आणि रक्ताशय संस्थेनं गेल्या ४१ वर्षांच्या परंपरेनु...

January 1, 2025 8:39 PM

views 57

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताराक्कासह ११ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोलीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत ११ जहाल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. यात ८ महिला आणि ३ पुरुष आहेत. त्यांच्यावर राज्यात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसं असून, छत्तीसगड सरकारनंही त्यांच्यावर बक्षिस जाहीर केलं होतं.    यात दंडकारण्य झोनल कमिटी प्रमुख आणि भूपती...

January 1, 2025 3:39 PM

views 107

विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय आणि इतर वाङ्‌मयीन पुरस्कार जाहीर

विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय आणि इतर वाङ्‌मयीन पुरस्कार आज जाहीर झाले. राज्यस्तरीय आशा सावदेकर स्मृती साहित्य समीक्षा पुरस्कार श्रीनिवास हेमाडे यांच्या ‘तत्वभान` या ग्रंथाला बहाल करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विदर्भ साहित्य संघ अनुवाद पुरस्कार दीपक घारे यांच्या ‘सैय्यद हैदर रक्षा -एका प्रतिभाव...

January 1, 2025 3:31 PM

views 46

महाराष्ट्राचे स्वतंत्र कृत्रिम बुद्धीमत्ता धोरण तयार करण्याचे मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

राज्याचं स्वतंत्र कृत्रिम बुद्धीमत्ता धोरण ठरवण्याच्या दृष्टीने राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली काल एक बैठक झाली. मार्च २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'इंडिया एआय मिशन' अंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढवण्यासाठी १० हजार ३७२ कोटीं रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आ...

January 1, 2025 3:22 PM

views 45

जलजीवन मिशनअंतर्गत विकासकामांचा आढावा घेण्यासाठी कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

खामगाव विधानसभा मतदारसंघात जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज बुलडाण्यात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. प्रत्येक गावात पाण्याची टाकी बांधण्याकरता तातडीनं जागा उपलब्ध करून द्यावी तसंच खामगाव विधानसभा मतदारसंघातले सर्व प्रकल्प २८ फेब्रुवारी २०२५ प...

January 1, 2025 3:19 PM

views 64

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई विद्यापीठानं उन्हाळी सत्राच्या विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मार्चमध्ये या परीक्षांना सुरुवात होईल. या परीक्षांना १ लाख ३८ हजार विद्यार्थी बसणार असून त्याकरता ४३९ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे विषय, आसन क्रमांक आणि...

January 1, 2025 2:20 PM

views 25

देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वेगाड्या उशीराने धावणार

देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वेगाड्या उशीराने धावत आहेत. दिल्लीहून सुटणाऱ्या किंवा तिथे पोचणाऱ्या बावीस गाड्या दोन तासांपर्यंत उशीराने धावत आहेत, अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनाने दिली आहे. प्रवाशांनी स्थानकावर पोहोचण्याआधी आपापल्या रेल्वेगाडीच्या वेळेत बदल झाला असल्...

January 1, 2025 2:19 PM

views 30

पुण्याजवळ कोरेगाव भीमा या ठिकाणी दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाचं दर्शन घ्यायला हजारोंची गर्दी

पुण्याजवळ कोरेगाव भीमा या ठिकाणी आज दोनशे सातव्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाचं दर्शन घ्यायला हजारोजण जमले आहेत. शहर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आज भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाला अभिवादन के...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.