प्रादेशिक बातम्या

January 22, 2025 8:13 PM

views 45

आम आदमी पक्ष दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यात अपयशी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

आम आदमी पक्ष दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यात अपयशी ठरला असून दिल्लीत मद्य उपलब्ध आहे पण पिण्यासाठी पाणी नाही. अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी आम आदमी पार्टीवर हल्लाबोल केला आहे. ते आज भाजपाच्या बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांबरोबर नमो एप वरुन संवाद साधताना बोलत होते. आप आणि काँग्रेस ...

January 22, 2025 7:46 PM

views 58

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम

मुलींची सुरक्षितता, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आज दहा वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त येत्या महिला दिनापर्यंत म्हणजेच ८ मार्चपर्यंत दशकपूर्ती अभियान राबवण्यात येणार आहे.  आज  राज्यात ठिकठिकाणी अभियानाचा प्रांरभ करणारे कार्यक्रम झाले.  नाशिक महानगरपालिकेत आ...

January 22, 2025 7:44 PM

views 201

संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या फरार आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

बीड जिल्ह्याती मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. कृष्णा आंधळे आधीच्याही एका गुन्ह्यात फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराड याच्यासह विष्णु चाटे, सुदर्शन घुले, स...

January 22, 2025 7:41 PM

views 27

नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी मराठवाड्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात

नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी मराठवाड्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पर्यावरणीय परवानग्या मागितल्या आहेत. शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातल्या पवनार इथून सुरू होणार असून महाराष्ट्र-गोव्याच्या सीमेवरील पत्रादेवी इथं संपणार आहे.

January 22, 2025 7:39 PM

views 35

राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाचं उद्घाटन

भारतीय टपाल विभागानं आपल्या दीडशे वर्षांहून अधिक काळाच्या वाटचालीत संवेदनशील सेवा देऊन लोकांशी भावनिक नाते जोपासले असल्याचं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मुंबईच्य...

January 22, 2025 7:34 PM

views 43

पुण्यात ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या आजाराचे २४ रुग्ण, प्रशासन ॲक्शन मोडवर

पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यांपासून अचानक जीबीएस, अर्थात 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. जीबीएस हा चेतासंस्थेशी संबंधित दुर्मिळ आजार आहे. पुण्यातला सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, विश्रांतवाडी, पर्वती, कसबा, कोथरूडसह उपनगर आणि ग्रा...

January 22, 2025 7:30 PM

views 46

संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात, तसंच वर्धा जिल्ह्याच्या आर्वी उपविभागात यंदाच्या पावसाळ्यात संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाख ८ हजार रुपयांची मदत राज्य शासनानं मंजूर केली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी ही माहिती दिली.

January 22, 2025 6:55 PM

views 31

रिलायन्सचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार

दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी राज्यात आणखी ३ लाख ५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाला. रिलायन्स सोबत झालेल्या या करारातून ३ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळं राज्यानं केलेल्या सामंजस्य करारांचं मूल्य ९ लाख ३० हजार कोटी रुपयां...

January 22, 2025 8:32 PM

views 38

जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू, १४ जखमी

जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ आज झालेल्या रेल्वे अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार करणार आहे.    या मार्गावरुन मुंबईकडे...

January 22, 2025 3:54 PM

views 14

केईएम रुग्णालयामध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावेत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केईएम रुग्णालय मुंबईकरांचा खऱ्या अर्थाने आधारवड असून त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएम मध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावेत असे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. ते केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मुंबई महापालिका आयुक्त...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.