प्रादेशिक बातम्या

January 23, 2025 6:46 PM

views 37

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचं निधन

पर्यावरण आणि वनहक्क चळवळीतले ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचं काल मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरमधे निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. गडचिरोली लेखा मेंढा गावाला देशपातळीवर ओळख निर्माण करुन देणारे मोहन हिराबाई हिरालाल यांच्यावर महात्मा गांधी ...

January 23, 2025 3:33 PM

views 7

लातूर जिल्ह्यात ४ हजार कोंबड्या मृत्युमुखी

लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव इथं ४ हजाराहून अधिक कोंबडीची पिल्लं काल संध्याकाळी अचानक मृत्युमुखी पडली. पशुसंवर्धन विभागाचं शीघ्र कृती दल ढाळेगावमध्ये दाखल झालं आहे.   मृत पक्ष्यांचे वैद्यकीय नमुने पुण्यात औंधच्या राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेत पाठवल्याचं या दलानं सांगितलं...

January 23, 2025 3:31 PM

views 41

अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट

बुलढाणा जिल्ह्यात देऊळगावराजा तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. बुलढाणा आणि सिंदखेडराजा इथल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने आज ही कारवाई केली. शिनगाव इथल्या बोटीवरच्या तीन मजुरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

January 23, 2025 3:30 PM

views 14

कृष्णा नदीतलं पुराचं पाणी मराठवाड्यात नेण्यासाठी जागतिक बँकेची मंजूरी

कृष्णा नदीतलं पुराचं पाणी मराठवाड्यात नेण्याचं नियोजन असून त्याबाबतच्या प्रकल्पास जागतिक बँकेनं मंजूरी दिली आहे. जागतिक बँकेचं एक पथक उद्या, २४ तारखेला यासाठी सांगली दौऱ्यावर येत आहे. या भागातील सांडपाणी प्रकल्पाची, अवर्षण प्रवण भागाची पाहणी पथकाकडून केली जाणार आहे.   तसंच पथक कृष्णा नदी आणि पर...

January 23, 2025 3:26 PM

views 28

अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते होणार आहे.   आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष २०२५ निमित्तानं वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या वि...

January 23, 2025 3:10 PM

views 46

सांगलीत मिनी सरस प्रदर्शन

उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता गटांनी तयार  केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशानं मिनी सरस प्रदर्शन सध्या सांगलीत भरलं आहे. बचत गटांच्या उत्पादनांचे ५४ स्टॉल आणि खाद्यपदार्थांचे २१ स्टॉल अशी ७५ दालनं प्रदर्शनात आहेत.  गोंदिया इथंही सध्या मिनी स...

January 23, 2025 2:52 PM

views 9

रामटेक विकासाबाबत लवकरच बैठक घेणार-चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर आणि आसपासच्या परिसरातली दीक्षाभूमी, ताजबाग तसंच रामटेक आणि इतर धार्मिक स्थळं यांच्या विकासाबाबत लवकरच बैठका घेऊन उपाययोजना करणार असल्याचं महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं.   नागपूरच्या प्रेस क्लब तर्फे आयोजित सत्कार आणि पत्रकारांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत...

January 23, 2025 2:31 PM

views 44

जळगाव रेल्वे अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यु

  महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात परधाडे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या १३ झाली आहे. त्यातल्या १० जणांची ओळख पटली असून त्यात एक लहान मूल आणि तीन महिलांचा समावेश आहे. शेजारच्या डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्यामुळं अपघातग्रस्त डब्यातल्या अनेकांनी गाडीतून बाहेर उड्या मारल...

January 23, 2025 3:06 PM

views 34

कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक डी. के. राव मुंबई पोलिसांच्या ताब्यात

कुख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक डी. के. राव याच्यासह सहा जणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं खंडणी प्रकरणी अटक केली आहे. एका हॉटेल मालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकानं त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे...

January 22, 2025 9:08 PM

views 45

निवडणुकीत उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर

राज्यस्तरीय पातळीवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. उत्कृष्ट निवडणूक अधिकारी, उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी, टपाली मतदानासाठी उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट मतदार सुविधा अशा विविध श्रेणींतर्गत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. लोकसभा निवडणुकीस...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.