प्रादेशिक बातम्या

January 27, 2025 3:28 PM

१००व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचं मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

राज्याचे उद्योग मंत्री आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते अहिल्यानगर इथल्या १००व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचं काल उद्घाटन झालं. राज्यातल्या गड-किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा लोककलांच्या माध्यमातून सादर करण्याबाबत लवकरच प्रयत्न करण्या...

January 27, 2025 12:41 PM

views 66

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे सेवानिवृत्त निवेदक सुरेश भावे यांचं निधन

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे सेवानिवृत्त निवेदक सुरेश भावे यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या देहदानाच्या इच्छेनुसार त्यांचं पार्थिव आज रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आलं. १९७७ पासून २००६ पर्यंत ते आकाशवाणीच्या सेवेत होते.  रंगभूमीवर...

January 26, 2025 7:23 PM

views 49

पालघरमध्ये ९ बांगलादेशी नागरिकांना अटक

पालघर जिल्ह्यात अवैध कागदपत्रांच्या आधारे वास्तव्यास असलेल्या नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. नालासोपाराच्या धानीवबाग भागातील गंगाडीपाडा येथून शुक्रवारी त्यांना पकडण्यात आलं. यामध्ये सात महिलांचा समावेश आहे. ते पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यातील हकीमपूर गावातून भारतात घुसले होते.

January 26, 2025 7:13 PM

views 29

रणजी करंडक : महाराष्ट्राचा बडोद्यावर ४३९ धावांनी दणदणीत विजय

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत, नाशिक इथं झालेल्या सामन्यात आज महाराष्ट्रानं बडोद्यावर ४३९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्रानं पहिल्या डावात, २९७ धावा केल्या होत्या, तर बडोद्यानं १४५ धावा केल्या. दुसऱ्या डावात ७ बाद ४६४ धावांवर महाराष्ट्रानं आज आपला डाव घोषित केला. सौरभ नवलेनं नाबाद १२६ धावा केल्...

January 26, 2025 7:26 PM

views 35

मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन यात मोठी बचत होणार असून प्रदूषण कमी करण्यात हा मार्ग महत्त्वाची भूमिका बजावेल, असं मुख्यमंत्री यावेळी ...

January 26, 2025 6:15 PM

views 49

नांदेडमध्ये बर्ड फ्लूमुळे ‘या’ भागात अलर्ट झोन

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात किवळा इथं कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे  तिथल्या दहा किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित केला आहे. किवळा इथं नुकतीच कोंबड्यांमधे मरतूक दिसून आल्यानं पशुसंवर्धन विभागानं मृत कोंबड्यांचे नमुने गोळा करून राज्यस्तरीय पुण्याच्या पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेत, तसंच ...

January 26, 2025 6:13 PM

views 83

राज्यात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन राज्यात इतरत्रही मोठ्या उत्साहात साजरा झाला.    नवी मुंबईत कळंबोली इथे पोलीस मुख्यालय मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त कोकण स्तरावरचं ध्वजारोहण संपन्न झालं. कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी तिरंगा फडकावला. या कार्यक्रमाला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नागर...

January 26, 2025 2:41 PM

views 22

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा ७ पद्म विभूषण, १९ पद्म भूषण आणि ११३ पद्म पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि सुप्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित ...

January 26, 2025 2:36 PM

views 47

७६वा प्रजासत्ताक दिन विविध देशांमध्येही साजरा

भारताचा ७६वा प्रजासत्ताक दिन आज विविध देशांमध्येही साजरा होत आहे. बांगलादेशात राजधानी ढाका इथं भारतीय उच्चायुक्तालयात प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बांगलादेशातले भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी तिरंगा ध्वज फडकावला. या सोहळ्यात भारतीय समुदायाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल...

January 25, 2025 7:29 PM

views 8

जास्त मतदान झाल्याच्या काँग्रेसच्या आक्षेपाला निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं नाही- नाना पटोले

विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतील मतदारांपेक्षा जास्त मतदान झाल्याच्या काँग्रेसच्या आक्षेपाला निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं नाही, याविरोधात आपण न्यायालयीन लढाई लढू, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.   ते आज नागपूर मध्ये वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक आयोगानं विधानसभेच्या निवडणुक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.