प्रादेशिक बातम्या

January 28, 2025 7:16 PM

views 28

मलेशियानं महाराष्ट्रातली उत्पादनं आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावा-जयकुमार रावल

महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान सांस्कृतिक समानता असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातले परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचं स्वागत करेल, असं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसुफ यांनी मंगळवारी रावल यांची सह्याद्री अतिथीगृहात ...

January 28, 2025 7:07 PM

views 38

इयत्ता दुसरी ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने लावण्याचा निर्णय रद्द

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने न लावण्याचा शासन आदेश सरकारनं आज प्रसिद्ध केला. पाठ्यपुस्तकांमध्ये लावलेल्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांनी उपयोग के...

January 28, 2025 6:59 PM

views 58

CUET-PG : अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशपरीक्षा १३ ते ३१ मार्च दरम्यान होणार

राष्ट्रीय परीक्षा संस्थेतर्फे घेतली जाणारी सर्व केंद्रीय आणि सहभागी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशपरीक्षा १३ ते ३१ मार्च दरम्यान होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी आहे.   इच्छुकांना exams.nta.ac/CUET-PG या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.

January 28, 2025 6:37 PM

views 43

मुंबईत बीएमसीचा अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिकेने १७ जानेवारी ते २४ जानेवारी या सात दिवसात फेरीवाल्यांकडून सुमारे २ हजार ७६३ साधनसामुग्री जप्त केली आहे. यात अनधिकृत ५४४ हातगाड्या, ९६८ सिलिंडर व १ हजार २५१ इतर साहित्य यांचा समावेश आहे. फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम अंतर्गत अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यां...

January 28, 2025 8:30 PM

views 52

जीबीएस रुग्णांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

जीबीएस, अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमधे विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेतला. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्...

January 28, 2025 3:30 PM

views 8

कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेची सुरुवात

कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत 'एक रेशन कार्ड एक साडी' या योजनेची सुरुवात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळमध्ये करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातल्या २४ लाख ८७ हजार ३७५ अंत्योदय शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार आहे. सहकारी यंत्रमाग संस्था आणि सूक्ष...

January 28, 2025 3:47 PM

views 68

राज्यात एसटी भाडेवाढ विरोधात आंदोलन

एसटी भाडेवाढ विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन झालं.  सिंधुदुर्गमधल्या कुडाळ बसस्थानकात आज सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. निवडणुकीपूर्वी एसटीची दरवाढ केली नव्हती पण आता निवडणूक झाल्याबरोबर महायुती सरकारने एसटीची  दरवाढ केली.  ही  दरवाढ रद्द झाली ...

January 28, 2025 1:53 PM

views 30

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र त्याच्या प्रत्यार्पणाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. २००८च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईवर हा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यातल्या सहभागामुळे दोषी ठरल्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाला विरोध ...

January 28, 2025 9:57 AM

views 41

महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे १११ रुग्ण

महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या १११ झाली असून, त्यातले १६ रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. राज्यातली ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. सात सदस्यांच्या या समितीमध्ये राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थ...

January 28, 2025 9:18 AM

views 58

गायक राहुल देशपांडे यांना ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’

लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा, पहिला लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे. येत्या सहा फेब्रुवारील लता दीदींच्या तिसऱ्या स्मृतीदिनी पुण्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.