प्रादेशिक बातम्या

February 2, 2025 12:22 PM

views 44

मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळावर एक किलो ६४९ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून काल एक किलो ६४९ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले. त्याचं आंतरराषट्रीय बाजार पेठेतलं मूल्य अंदाजे १६ कोटी ४९ लाख रुपये इतकं आहे. पॅरिसमार्गे मुंबईला आलेल्या प्रवाशाकडून  पांढऱ्या रंगाच्या १७०...

February 2, 2025 12:15 PM

views 31

राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल-माणिकराव कोकाटे

राज्यातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने शेती विकसित करता यावी, यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. काल नाशिक इथं कोकाटे यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आता ड्रो...

February 2, 2025 12:07 PM

views 29

गडचिरोली जिल्ह्यातले पंचायत समितीचे माजी सभापती यांची हत्या

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची काल नक्षलवाद्यांनी गळा दाबून हत्या केल्याचं वृत्त आहे. मडावी हे भामरागड तालुक्यातल्या कियर इथले रहिवासी होते. २०१७ ते २०१९ अशी अडीच वर्षे ते भामरागड पंचायत समितीचे सभापती होते. सध्या ते उपसभापती म्हणून कार्यरत होते. घटनास्थ...

February 2, 2025 2:25 PM

views 23

पाणी प्रश्नाबाबत जागृतीसाठी मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानकडून जलसंवाद परिषदेचं आयोजन

मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं जलसंवाद २०२५ या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाड्याची पाण्याची गरज आणि पाणी उपलब्धतेच्या संभाव्य उपाययोजना या संदर्भात या परिषदेत चर्चा होणार आहे. चिकलठाणा परिसरात मसिआ संघटनेच्या सभागृहात आज सकाळी नऊ वाजता होणाऱ्या या परिषदेला ...

February 1, 2025 2:49 PM

views 46

देशातल्या शेअर बाजारांकडून या अर्थसंकल्पाला संमिश्र प्रतिक्रिया

देशातल्या शेअर बाजारांकडून या अर्थसंकल्पाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाली आहे. व्यवहार सुरू झाले तेव्हा तेजीत असलेले सेन्सेक्स आणि निफ्टी अर्थसंकल्प सुरू होऊन सुमारे पाऊण तास झाल्यावर जोरदार कोसळले. मात्र आयकर सवलतींच्या घोषणांमुळे त्याला उभारी मिळाली. सध्या दोन्ही निर्देशांकात किरकोळ घसरणीसह व्यवहार स...

January 31, 2025 8:14 PM

views 46

मुंबई रेल्वे बाॅम्बस्फोट : राज्यसरकारच्या याचिकेवरचा निर्णय उच्च न्यायालयाकडू राखून

मुंबईत जुलै २००६ मधे झालेल्या रेल्वे बाँबस्फोट प्रकरणी १२ आरोपींना ठोठावलेली फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा कायम करण्यासाठी राज्यसरकारनं दाखल केलेल्या याचिकेवरचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं आज राखून ठेवला. २०१५ मधे कनिष्ठ न्यायालयानं या १२ आरोपींना दोषी ठरवलं, आणि त्यापैकी ५ जणांना फाशी, तर सात जणांना...

January 31, 2025 7:19 PM

views 51

राज्यात जीबीएस आजारामुळे ४ जणांचा मृत्यू

गुइलेन बॅरे आजाराचं निदान झालेल्या दोन रुग्णांचा आज पुण्यात मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात या आजारानं मरण पावलेल्यांची संख्या आता ४  झाली आहे.  आज मृत पावलेल्यांमध्ये एका टॅक्सी चालकाचा आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. राज्यात गुइलेन बॅरे आजाराच्या संशयित रुग्णांची संख्या १३० वर पोहोचली असून यापैकी ...

January 31, 2025 7:51 PM

views 41

तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला पुण्यात प्रारंभ

कृत्रिम बुध्दिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाला न घाबरता त्या तंत्रज्ञानाचा उपयोग मराठी भाषेचा विकास आणि समृद्धीसाठी कसा करता येईल, यादृष्टीने विचार करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत...

January 31, 2025 3:50 PM

views 52

बीएसएनएलच्या ‘बल्क पुश एसएमएस ए टू पी’ सेवेचं उद्घाटन

मोबाईल फोनवर बँकांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणात एसएमएस पाठवता येतील अशा सुरक्षित सेवेचं व्यासपीठ बीएसएनएलने उपलब्ध करुन दिलं आहे.  बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. रॉबर्ट जे. रवी यांच्या हस्ते या बल्क पुश एसएमएस ए टू पी सेवेचं उद्घाटन काल मुंबईत झालं. बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध ...

January 31, 2025 3:48 PM

views 51

अकोल्यात जीबीएसचे ४ रुग्ण

पुण्यात आढळून आलेल्या जीबीएस अर्थात गुइलेन-बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराचे रुग्ण आता अकोल्यातही आढळून आले आहेत. अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जीबीएस सिंड्रोमच्या ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील १ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून उपचार घेणाऱ्या चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.