प्रादेशिक बातम्या

December 26, 2025 7:21 PM

views 180

पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुण्याचे माजी महापौर आणि नुकताच राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या पुण्यातल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह आज काँग्रेसमधे प्रवेश केला. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं पक्षात स्वागत केलं.   ...

December 26, 2025 6:00 PM

views 111

धुळे महापालिका निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढत देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी

धुळे महापालिका निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी असल्याचं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री अनिल पाटील यांनी धुळ्यात स्पष्ट केलं. प्रत्येक प्रभागातून सक्षम उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली असली तरी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव, आणि...

December 26, 2025 5:36 PM

views 90

लातुरच्या निलंगा तालुुक्यात भूकंप नसल्याची नोंद

लातुरच्या निलंगा तालुक्यातल्या निटुर परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मौजे निटुर परिसरात आज दुपारी भूगर्भातून गूढ आवाज होऊन भूकंप सदृष धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली होती. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनानं नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉ...

December 26, 2025 5:26 PM

views 780

मनसेला धक्का! प्रकाश महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले प्रकाश महाजन यांनी आज ठाण्यातत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आपण पद किंवा उमेदवारीसाठी कोणतीही मागणी न करता शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं महाजन यांनी बातमीदाराशी बोलताना सांगितलं. ते शिवसेनेचे प्रवक्ते असतील, असं शिंदे यां...

December 26, 2025 5:34 PM

views 43

कबुतरांना खाऊ घातल्याप्रकरणी व्यावसायिक दोषी

     कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घातल्याप्रकरणी  मुंबईतल्या दंडाधिकारी न्यायालयानं एका व्यावसायिकाला दोषी ठरवलं आहे. त्याला ५ हजार रुपये दंड भरण्याचे निर्देशही  न्यायालयानं  दिले आहेत. कबुतरांना अशा प्रकारे खाऊ घातल्यामुळं संसर्ग पसरू शकतो. त्यामुळं मुंबई महानगर पालिकेनं कबुतरांना खाऊ घालण्यावर ब...

December 26, 2025 3:32 PM

views 31

कंत्राटदारांच्या अनामत ठेवींचा घोटाळा करणाऱ्या दोन आरोपींना कोठडी

पालघर जिल्ह्यातल्या जव्हार सार्वजनिक विभागातल्या  कंत्राटदारांच्या अनामत ठेवींचा घोटाळा करणाऱ्या दोन मुख्य आरोपींना जव्हार दंडाधिकारी न्यायालयानं २९ डिसेंबर पर्यंत  पुन्हा पोलीस कोठडीत रवाना केलं आहे.    बनावट स्वाक्षऱ्या असलेल्या धनादेशाच्या आधारे सरकारी खात्यातून १११ कोटी ६३ लाख रुपये काढण्या...

December 25, 2025 6:58 PM

views 48

काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या पार्थिवावर आज, नंदूरबारमधल्या नवापुर तालुक्यातल्या नवागाव या त्यांच्या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी सुरुपसिंग नाईक यांना हवेत बंदुकीच्या तीन फैरीझाडून मानवंदना देण्यात आली. सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे राज शिष्टाचार म...

December 25, 2025 7:35 PM

views 129

Municipal Election: राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

राज्यातल्या २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्या घटक पक्षांमधे स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणं मांडली जात आहेत. उमेदवारांच्या मुलाखतींसाठी दोन्ही आघाड्यांची शिब...

December 25, 2025 7:35 PM

views 210

महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडीसोबत लढवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न

महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडमंडळाची बैठक आज मुंबईत टिळक भवन इथं झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव ...

December 25, 2025 2:48 PM

views 61

नवी मुंबई विमानतळाचं परिचालन सुरु

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक उड्डाणं सुरू झाली. आज सकाळी आठ वाजता बेंगळुरूहून आलेलं पहिलं विमान धावपट्टीवर उतरलं. या विमानाला हवेत पाण्याचे फवारे सोडून सलामी देण्यात आली. तर सकाळी पावणे नऊ वाजता या विमानतळावरून हैदराबादच्या दिशेने पहिलं विमान आकाशात झेपावलं. सध्या या विमा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.