प्रादेशिक बातम्या

March 1, 2025 12:23 PM

views 43

राज्यभरातले इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन

येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातले इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातला शासन आदेश काल प्रसिद्ध झाला.   आतापर्यंत केवळ मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक महापालिका क्षेत्रातले अकरावी चे प्रवेश ऑनलाइन होत होते. इ...

March 1, 2025 12:17 PM

views 60

कोकणचा विकास आता थांबणार नाही -पालकमंत्री नितेश राणे

कोकणचा विकास आता थांबणार नाही असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. कोकण सन्मान या कार्यक्रमात देवगड इथे ते बोलत होते.   कोकणातील निसर्ग सौंदर्य, विविधता आणि खाद्य संस्कृती यांचं चित्रीकरण सामाजिक माध्यमातून जगामध्ये पोहोचवण्याचं कार्य करणाऱ्या कोकणातील रील क्रिए...

March 1, 2025 12:12 PM

views 43

भंडारातील यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंत्याला लाचलुचपत प्रकरणात अटक

जलशुद्धीकरण कामाचं देयक काढण्यासाठी ४० हजारांची लाच मागणाऱ्या भंडारा जिल्हा परिषदेतील यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंता सुहास करंजेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. प्रभारी उपअभियंता करंजेकर विरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   भंडारा इथल्या ...

February 28, 2025 7:40 PM

views 52

अलिबाग समुद्र किनाऱ्याजवळ मच्छिमार बोटीला

अलिबाग समुद्रकिनाऱ्याजवळ आज आग लागलेल्या मच्छिमार बोटीतून १४ मच्छिमारांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीला आग लागल्याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दल वेळीच घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत बोट जळून खाक झा...

February 28, 2025 7:34 PM

views 89

नागरिकांना राज्य सरकारच्या ५०० सेवा व्हॉट्सअपद्वारे मिळणार

राज्य सरकारनं फेसबुक आणि व्हॉट्सअपची प्रवर्तक असलेल्या मेटा या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. याद्वारे व्हॉट्सॲप गव्हर्नन्स ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या ५०० सेवा सामान्य नागरिकांना व्हॉट्सॲपवर मिळणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. मुंबई ...

February 28, 2025 7:35 PM

views 51

स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला पोलीस कोठडी

पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयानं १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मध्यरात्री त्याला शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावातून अटक केली होती. हे प्रकरण द्रुतगती न्यायालयात चालवलं जाईल, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

February 28, 2025 7:35 PM

views 53

अकरावीचे प्रवेश ‘ऑनलाइन’

येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातले इयत्ता ११ वी प्रवेश ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातला शासन आदेश आज प्रसिद्ध झाला.आतापर्यंत केवळ मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक महापालिका क्षेत्रातले ११ वी प्रवेश ऑनलाइन होत होते. इयत्ता ११ वी चे स...

February 28, 2025 7:41 PM

views 38

आंतरराष्ट्रीय महिला दिन : महिला पर्यटकांना MTDCच्या पर्यटक निवासांमध्ये सवलत

MTDC अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त  राज्यातल्या महिला पर्यटकांना येत्या १ ते ८ मार्च या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. एमटीडीसीच्या www.mtdc.co या संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ घेण्याचे ...

February 28, 2025 4:01 PM

views 65

‘धनगर समाजाने ST प्रवर्गात आरक्षण मागण्याऐवजी OBC प्रवर्गातलं आरक्षण टिकवावं’

धनगर समाजाने एसटी प्रवर्गात आरक्षण मागण्याऐवजी ओबीसी प्रवर्गातलं आरक्षण टिकवावं, असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. लातूर इथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली. वारंवार उपोषणाला बसून जरांगे यांनी लोकशाहीतल्या उपोषणासारख्या ...

February 28, 2025 3:55 PM

views 44

वर्तनातून मराठीचा अभिमान जागवणं, हीच मराठीची सेवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपल्या वर्तनातून मराठीचा अभिमान जागवणं, हीच खऱ्या अर्थानं  माय मराठीची सेवा आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासात अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा  सन्मान सोहळा काल  मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडीया इथं पार पडला. त्या कार्यक्रमात ते काल  बोलत  होते...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.