प्रादेशिक बातम्या

March 1, 2025 7:08 PM

views 40

वेव्हजमध्ये कम्युनिटी रेडिओ कंटेट स्पर्धेचं आयोजन

वेव्हज परिषदेत कम्युनिटी रेडिओ कंटेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कम्युनिटी रेडिओ स्टेशनवरून प्रसारित होणाऱ्या नावीन्यपूर्ण, सर्जनशील कार्यक्रमांचं महत्व अधोरेखित करणं, प्रादेशिक वैशिष्ट्य आणि स्थानिक कलाकारांना सक्षम करणं हा याचा हेतू आहे. ही परिषद १ ते ४ मे रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.

March 1, 2025 7:52 PM

views 56

माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर ५ मार्चला सुनावणी

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला त्यांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिलं असून यावर ५ मार्च रोजी न्यायालय निकाल सुनावणार आहे. सदनिका खरेदी करताना कोकाटे यांनी खोटी माहिती दिली यासाठी त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुुनावली आहे, या शिक्षेला स्थगिती मिळावी यासा...

March 1, 2025 6:55 PM

views 56

मजबूत विकासासाठी देशाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज – मंत्री नितीन गडकरी

मजबूत विकासासाठी देशाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयोजित इनोव्हर्स परिषदेत बोलत होते. भारत ही जगातली सर्वात  वेगानं वाढणारी  अर्थव्यवस्था असून यात उद्योग क्षेत्राची भूमिका मोठी आहे, असंही ते म्हणाले.

March 1, 2025 7:19 PM

views 54

३५व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप

३५व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ठाण्यात झाला. विविध क्रीडा प्रकारात सहभागी झालेल्या खेळाडूंचं फडणवीस यांनी अभिनंदन केलं. संघभावना जोपासण्यासाठी खेळ खेळणं आवश्यक आहे, त्यामुळे क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा असं ...

March 1, 2025 3:54 PM

views 14

८२ दिवसांत ५७ हजार ३३ घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवण्यात उद्दिष्ट पूर्ण

वीज महावितरण कंपनीने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचं राज्य सरकारनं दिलेलं उद्दिष्ट ८२ दिवसांत पूर्ण केलं आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली.   पाच डिसेंबरपर्यंत राज्यात ७१ हजार ४३७ तर त्यानंतर शंभर दिवसांच्या मोहिमेत ८२ दिवसांत ५७ हजार ३३ घरां...

March 1, 2025 3:48 PM

views 54

अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु होणार आहे. अधिवेशनासाठी सुरक्षाव्यवस्था आणि तयारीचा आढावा काल घेण्यात आला.   विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुरक्षा, वाहन तळ व्यवस्था, वैद्यकीय सुवि...

March 1, 2025 3:42 PM

views 72

कोयना परिसर पर्यटन हब बनविणार- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

सातारा जिल्ह्यातल्या कोयना परिसराला पर्यटन हब बनवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलत एमटीडीसी म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना रिसॉर्टचं आधुनिकीकरण आणि नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कोयना पर्यटन विकासासंदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा ...

March 1, 2025 3:27 PM

views 70

विधानसभेत काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख यांची नियुक्ती

काँग्रेसचे विधानसभेतले मुख्य प्रतोद म्हणून आमदार अमित देशमुख यांची तर प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते म्हणून अमीन पटेल तर सचिव म्हणून विश्वजित कदम यांची नियुक्ती झाली आहे.   विधानपरिषदेचे गटनेतेपदी सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली...

March 1, 2025 3:13 PM

views 29

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत त्या बोलत होत्या. शहरी भागातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या योजनांसंदर्भात...

March 1, 2025 1:27 PM

views 57

राज्यस्तरीय मेळाव्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत राज्यस्तरीय मेळाव्याचं उद्घाटन पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. राज्यभरात जिल्हास्तरावल्या ३५ तर तालुकास्तरावल्या ३५५ शाळांमधे हा मेळावा होत आहे. या कार्यक्रमा अंतर्गत शून्य ते १८ वर्षे वयोगटातल्या मुला मुलींची मोफत आरोग्य तपासणी केली ज...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.