प्रादेशिक बातम्या

May 29, 2025 8:16 PM

views 55

भंडारा जिल्ह्यात अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं बिबट्या ठार

भंडारा जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या कोकणागड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं बिबट्या जागीच ठार झाला. धारगाव परिसर हा जंगलव्याप्त असून परिसरात नेहमी वन्य प्राण्यांचा वावर असतो.    बिबट्या रस्ता ओलांडत काल रात्री साडेआठवाजता  त्याचा मृत्यू झाला असून याची माहिती वन विभागाला देण...

May 29, 2025 8:08 PM

views 47

राज्यात ठीकठिकाणी पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत, मात्र जिल्ह्यात पावसाचा जोर आता ओसरल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत १२ पूर्णांक ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  सध्या जायकवाडी धरणात २९ पूर्णांक ७९ शतांश टक्के पाणीसाठा असल्याचं प्रश...

May 29, 2025 7:52 PM

views 22

विकसित कृषि संकल्प अभियानाला सुरुवात

राज्यात परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून आज विकसित कृषि संकल्प अभियानाला सुरुवात झाली. चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी अभियानाला सुरुवात केली. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल, शेतकऱ्यांना  आधुनिक तंत्रज...

May 29, 2025 7:30 PM

views 116

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक

गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार ८७५ कोटी इतकी विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. ही गुंतवणूक देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के इतकी आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक ३२ टक्के अधिक आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गे...

May 29, 2025 7:27 PM

views 51

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा समूह विमा काढला जाणार

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा समूह विमा काढला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारीत येणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. त्याविषयी माहिती देताना शिंदे आज वार्ताहरा...

May 29, 2025 3:33 PM

views 49

संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटन

आज परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत झालं. वातावरण बदलामुळे शेती पारंपरिक पद्धतीने करता येत नाही तिच्यात गुंतवणूक होणं आवश्यक आहे, मात्र ७९ टक्के शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्याच्यात गुं...

May 29, 2025 9:32 AM

views 20

अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या विकासासासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर

अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या विकासासासाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपयांच्या विकास आराखड्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आराखड्यातील सर्व कामं मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी ...

May 29, 2025 9:53 AM

views 71

अहिल्यानगरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं असून नुकसानाचे सरसकट पंचनामे अधिकचं मनुष्यबळ उपलब्ध करून तातडीनं करावेत. शासनाच्या स्थायी आदेशाप्रमाणे आपतीग्रस्तांना मदत मिळेलच, परंतू विशेष बाब म्हणूनही मदत आणि पुनर्वसन विभागाकडे मदतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री आणि अहिल्यानगरचे प...

May 28, 2025 8:11 PM

views 80

देशाच्या सर्व भागात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागानं उद्या आसाम, मेघालय, कर्नाटकाचा किनारी भाग आणि दक्षिण कर्नाटक, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरुणाचल प्रदेश,ओडिशा,तेलंगणा,पश्चिम बंगाल आणि सिक्कीम इथेही उद्या जोरदार पर्जन्यवृष्टी...

May 28, 2025 7:13 PM

views 33

राज्यातल्या विविध देवस्थानांच्या विकासासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता

राज्यातल्या विविध देवस्थानांच्या विकासासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाली असून यासंदर्भातले शासननिर्णय नियोजन विभागानं आज जारी केले. यामध्ये तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी १ हजार ८६५ कोटी, मौजे चौंडी इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मृतीस्थळाच्या विका...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.