प्रादेशिक बातम्या

June 1, 2025 4:45 PM

views 37

डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती ठरेल असा विश्वास-अजित पवार

शेती म्हणजे संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे या भावनेनं एकत्र काम केलं तर राज्याची शेती डिजिटल युगात जगाला दिशादर्शक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  व्यक्त केला. कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयांसह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यानं देशात ...

June 1, 2025 3:38 PM

views 61

कला, सामाजिक, राजकारणात ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’ प्रदान

कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’ प्रदान केले जाणार आहेत. दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह इथं ३ जून रोजी दुपारी ३ वाजता हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पद्म...

June 1, 2025 3:42 PM

views 39

नाशिकमधे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

त्र्यंबकेशर आणि नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक इथं १३ प्रमुख आखाड्यांचे महंत, साधुसंत, सर्व प्रमुख पुरोहीत संघाचे प्रतिनिधी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली.    कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या दृष्टीनं करायच्या कामांसाठी ४ हजार कोटी रुपयांच्या...

June 1, 2025 3:28 PM

views 51

मान्सूनचा प्रवास रखडल्यानं पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

बदललेल्या वातावरणामुळं मान्सूनचा प्रवास सध्या रखडलेला असून, १० जूनपर्यंत राज्यात पावसाचं प्रमाण कमीच राहाणार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागानं विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांना दिला आहे. किमान १० जूनपर्यंत राज्यात बहुतांश भागात  हवामान कोरडं ...

June 1, 2025 1:57 PM

views 36

आज जागतिक दूध दिवस साजरा

लाखो लोकांच्या उपजीविकेचा स्रोत तसंच जागतिक अन्न म्हणून दुधाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आज जागतिक दूध दिवस साजरा होत आहे. जागतिक पातळीवर दुधाचं उत्पादन दोन टक्क्यानी वाढतं. पण भारतात वाढीचं प्रमाण ५ पूर्णांक ७ दशांश टक्के आहे. त्यामुळे जगातला सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून भारत ओळखला ...

June 1, 2025 1:32 PM

views 30

मुख्यमंत्री सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर असून ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी नाशिक मधल्या तीन आणि त्र्यंबकेश्वर मधल्या दहा आखाड्यांचे महंत उपस्थित राहणार आहेत. नाशिकमधल्या कुंभमेळा पर्वाच्या तारखा यावेळी घोषित केल्या जातील. यानंतर महाराष्ट्र आरोग...

May 31, 2025 6:29 PM

views 38

कटरा रेल्वे स्थानक ते मुंबई पहिली समर्पित चेरी मालवाहतूक सेवा आजपासून सुरू

जम्मू आणि काश्मिरमध्ये भारतीय रेल्वेनं फलोत्पादन विभागाच्या सहकार्यानं कटरा रेल्वे स्थानक ते मुंबई पहिली समर्पित चेरी मालवाहतूक सेवा आजपासून सुरू केली. यामुळे, जम्मू काश्मिरच्या फलोत्पादन क्षेत्राला आणि त्याच्या मुख्य बाजारपेठांशी संपर्क यंत्रणेला प्रोत्साहन मिळणार आहे. नाशवंत मालाला मुख्य बाजारपेठे...

May 31, 2025 6:22 PM

views 48

पालघरमधे मेंढवन घाटात अपघातात दोघांचा मृत्यू

पालघरमधे मेंढवन घाटात आज कार आणि कंटेनरच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही कार गुजरातहून मुंबईकडे येत होती. कारची कंटेनरला पाठीमागून धडक बसल्याने हा अपघात झाला.

May 31, 2025 6:21 PM

views 105

अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं कार्य तीनशे वर्षांनीही प्रेरणादायी-मुख्यमंत्री

अहिल्याबाई होळकर यांच्या राजवटीत कृषी, कर आणि न्याय पद्धती आदर्श होती. त्यांनी केलेलं कार्य तीनशे वर्षांनीही प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आयोजित जयंती उत्सवात ते बोलत होते. यावेळी  विविध विकासकामांचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच...

May 31, 2025 3:21 PM

views 54

अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्यांची जयंती साजरी

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्यांची जयंती साजरी होत आहे. जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे उपस्थित आहेत. यावेळी  विविध विकासकामांचा आज प्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.