प्रादेशिक बातम्या

June 29, 2025 8:47 PM

views 40

मराठी माणसाची शक्ती सरकारच्या सक्तीला हरवू शकते, हे त्रिभाषा धोरणासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयावरून स्पष्ट होतं – नेते उद्धव ठाकरे

मराठी माणसाची शक्ती सरकारच्या सक्तीला हरवू शकते, हे त्रिभाषा धोरणासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयावरून स्पष्ट होतं, असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज वार्ताहर परिषदेत केलं. यासंदर्भात सरकारनं नेमलेल्या समितीला काहीही अर्थ नाही. कोणतीही समिती नेमली, तरी हिंदी...

June 29, 2025 8:45 PM

views 44

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी, ती ...

June 29, 2025 7:52 PM

views 42

इंडिया रेटींग अँड रिसर्च या अर्थविषयक संस्थेच्या वतीनं २०२४ – २०२५ या वर्षासाठी जाहीर केलेल्या पत मानांकनात नवी मुंबई महानगर पालिकेला डबल ए प्लस स्टेबल मानांकन जाहीर

इंडिया रेटींग अँड रिसर्च या अर्थविषयक संस्थेच्या वतीनं २०२४ - २०२५ या वर्षासाठी जाहीर केलेल्या पत मानांकनात नवी मुंबई महानगर पालिकेला डबल ए प्लस स्टेबल मानांकन जाहीर झालं आहे. नवी मुंबई महानगर पालिकेनं सलग अकराव्या वर्षी हे मानांकन मिळवलं असून, अशी कामगिरी करणारी ती देशातली एकमेव महानगरपालिका ठरली आ...

June 29, 2025 7:49 PM

views 18

सरन्यायाधीश आणि विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन

नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आज सरन्यायाधीश आणि विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झालं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. या विद्यापीठाची जागतिक स्तराव...

June 29, 2025 7:45 PM

views 37

पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भातल्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ राज्यभरात विविध ठिकाणी शासन निर्णयाची होळी

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भातल्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ आज राज्यभरात विविध ठिकाणी विविध पक्षसंघटनांनी या शासन निर्णयाची होळी केली. त्रिभाषा सूत्र राज्यात लागू न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, काँग्रेस, माकप, भाकप, वंचित ब...

June 29, 2025 7:36 PM

views 55

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, येत्या २९ ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा

मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांनी आज जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं मराठा समाजबांधवांची राज्यव्यापी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. आता आपल्याला रणभूमीत उतरून मैदान गाजवायचं अ...

June 29, 2025 7:30 PM

views 157

त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची घोषणा

शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी, ती कोणती असावी, कशी शिकवली जावी, यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर प...

June 29, 2025 3:16 PM

views 14

भ्रष्टाचार, मराठीवर अन्याय, हिंदी सक्ती, शक्तिपीठ महामार्ग इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप / अधिवेशन पूर्व चहापान कार्यक्रमावर बहिष्काराचा निर्णय

भ्रष्टाचार, मराठीवर अन्याय, हिंदीची सक्ती, शक्तिपीठ महामार्गाला विरोध इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा महाविकास आघाडीनं आज केली. महाविकास ...

June 28, 2025 7:37 PM

views 65

देशातल्या पहिल्या कॉन्स्टीट्युशन प्रीॲम्बल पार्कचं सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात उभारण्यात आलेल्या संविधान उद्देशिका पार्कचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते झालं. पार्कच्या आवारात उभारलेल्या डॉ...

June 28, 2025 5:07 PM

views 31

महास्ट्राइड प्रकल्पांतर्गत सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आज सुरू होणार

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महास्ट्राइड या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अग्रेसर बनवणाऱ्या प्रकल्पांतर्गत सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन आज नागपूर इथं होणार आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था-आय.आय.एम. इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.